HSC Results 2020 | File Photo

Maharashtra HSC Result 2020: प्रदीर्घ काळ लांबलेला महाराष्ट्र बोर्डाचा 12 वीचा निकाल आज (16 जुलै) अखेर जाहीर होणार आहे. आज दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे 12 वीचे विद्यार्थी आणि पालक वर्ग यांची प्रतिक्षा आता संपणार आहे. महाराष्ट्रात यंदा 15 लाख 5 हजार 27 विद्यार्थी बारावीच्या परीक्षेला बसले होते. दरम्यान 12 वी चा निकाल मे महिन्याच्या अखेरपर्यंत जाहीर केला जातो. परंतु, यंदा कोरोना व्हायरस संकटामुळे लांबलेली पेपर तपासणीची प्रक्रीया यामुळे निकाल जाहीर होण्यास उशिर झाला आहे. यापूर्वी जुलैच्या मध्यापर्यंत 12 वी चा निकाल लावणार असल्याचे शिक्षण मंडळाकडून सांगण्यात आले होते. त्यानुसार आज निकाल जाहीर होणार आहे. हा निकाल विद्यार्थी mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटवर पाहु शकतात.

12 वीचा निकाल ऑनलाईन कसा पाहाल?

# mahresult.nic.in या अधिकृत वेबसाईटला भेट द्या.

# या वेबसाईटच्या होमपेजवर Latest Announcement Of the HSC Results चा ऑप्शन दिसेल.

# तिथे HSC Examination Result 2020 वर क्लिक करा.

# नवीन विंडो ओपन होईल. तिथे तुम्हांला रोल नंबर (Roll Number) आणि आईचं नाव (Mother's Name) टाईप करा.

# त्यानंतर View Result वर क्लिक करा.

# तुमचा निकाल तुम्हाला स्क्रीनवर दिसेल.

# निकाल डाऊनलोड करण्याची आणि प्रिंट काढण्याची सोय उपलब्ध आहे.

तसंच mahresult.nic.in, maharashtraeducation.com, results.mkcl.org, mahahsscboard.maharashtra.gov.in, mahahsscboard.in या वेबसाईटवरही तुम्ही निकाल पाहु शकाल. एसएमएसच्या माध्यमातूनही तुम्ही निकाल पाहु शकता. MH<exam name> <Seat No> असे टाईप करुन 57766 वर पाठवा. दरम्यान गेल्या वर्षी 12 वी चा निकाल 85.88% लागला होता.