Maggi Laddu: बाबो! युजरने मॅगीपासून बनवले लाडू, सोशल मिडियावर फोटो व्हायरल; लोक म्हणतात- 'आता हे सहन होत नाहीये', पहा मजेशीर प्रतिक्रिया
मॅगी लाडू (Photo Credit : Twitter)

लोकांचे मॅगीवरील (Maggi) प्रेम हे सर्वश्रुत आहे. जर आपल्याला भूक लागली असेल आणि त्वरीत काहीतरी खायला मिळण्याचा पर्याय हवा असेल, तर हमखास मॅगीची आठवण काढली जाते. सकाळी ब्रेकफास्ट असो वा संध्याकाळचे खाणे, मॅगी हा एक उत्तम पर्याय मानला जातो. मॅगीवर लोक विविध प्रकारचे प्रयोगही करतात. आपल्याला हव्या त्या गोष्टी मॅगीमध्ये घालून त्याला एक वेगळे रूप दिले जाते. महत्वाचे म्हणजे आताही मॅगीसोबत घडलेला एक नवा प्रयोग सोशल मीडियावर पाहायला मिळत आहे. अलीकडेच एक फोटो समोर आला आहे, ज्यामध्ये मॅगीचा वापर मिष्टान्न म्हणून केला गेला असून, त्यापासून चक्क लाडू (Maggi Laddu) बनवले आहेत.

विश्वास ठेवायला कठीण आहे मात्र हे खरे आहे. सध्या अशा मॅगी लाडूचे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या मॅगी लाडूला गुळ, वेलची आणि तूप अशा गोष्टी घालून बनवण्यात आले आहे. त्यावर गार्निशिंगसाठी काजू ठेवले आहेत. हा फोटो पाहून लोकांनी अनेक चित्र विचित्र प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली आहे. नक्कीच हा मॅगीपासून लाडू बनवण्याचा प्रयोग लोकांना आवडलेला दिसत नाही.

(हेही वाचा: 'हमारे को दवाओं से नहीं, पेग से असर होगा'; दिल्लीत दारू खरेदीसाठी आलेल्या महिलेचा अजब दावा, Watch Video)

हे पहिल्यांदाच नाही जेव्हा जेव्हा मॅगीसोबत असा विचित्र प्रयोग केला गेला आहे. यापूर्वी दहीसोबत मसाला मॅगी, योगर्ट मॅगी, ऑरेंज मॅगी, पाणी पुरीसह मॅगी चॉकलेट मॅगी इत्यादी बरेच प्रकार समोर आले आहेत. तसेच 2019 मध्ये मॅगीची खीरही बनवण्यात आली होती. मात्र आता मॅगी लाडूचे फोटोपाहून सोशल मिडियावर टीकेचे झोड उठली आहे.