
मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) बडवानी जिल्ह्यात एका शिक्षकाचा दारुच्या नशेतील एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात व्हायरल होत आहे. त्यामध्ये शिक्षक मद्यधुंद असून तो शाळेचा गणवेश स्वत: आणि विद्यार्थ्यांना घालताना दिसून येत आहे. या प्रकारामुळे संताप व्यक्त केला जात आहे. हा सर्व प्रकार जवळजवळ एकतासभर सुरु असल्याने त्याचा व्हिडिओ बनवून सोशल मीडियात व्हायरल करण्यात आला आहे.
पाटी विकासखंड मधील ठेंग्चा गावातील एका माध्यमिक शाळेत दारुच्या नशेतील शिक्षकाचा व्हिडिओ समोर आला आहे. यापूर्वीसुद्धा मुख्याध्यापकांचा सुद्धा सार्वजनिक ठिकाणी दारुच्या नशेत असतानाचा प्रकार समोर आला होता. परंतु या घटनेवर जिल्हा कलेक्टर यांनी आक्षेप घेतला असून मुख्याध्यापकाला निलंबित करण्यात आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तुलसीराम कोटचे शाळेचे संस्थापक आहेत. शाळेतील काही विद्यार्थांना शाळेचा गणवेश देण्यात आला होता तर काही गणवेश शिल्लक राहिले होते. परंतु सोमवारी दुपारी तुलसीराम शाळेत पोहचताच त्यांनी एका पिशवीमधील गणवेश काढले आणि विद्यार्थ्यांच्या समोर तो घालून दाखवण्यास सुरुवात केली. या प्रकारानंतर विद्यार्थ्यांचे पालक संतप्त झाले आहेत.(जंगलातलं अस्वल गावात पाहून बुलढाणा मध्ये उडाली गावकर्यांची घाबरगुंडी! (Watch Video)
असे सांगितले जात आहे की, शाळेत सुरु असलेला प्रकार थांबवण्याचा प्रयत्नसुद्धा करण्यात आला नाही. मात्र या घटनेची माहिती उच्च अधिकाऱ्यांना देण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे.