क्रॉंकिटीकरणाच्या जंगलात आजकाल प्राण्यांचा वावर मानवी वस्तीमध्ये वाढण्याचे प्रमाण अधिक आहे. अनेकदा मानवी वस्तीमध्ये बिबट्या, वानरांचा धुमाकूळ असल्याचं आपण पाहिलं आहे. पण बुलढाण्याच्या गिर्डा गावामध्ये चक्क अस्वल शिरल्याची घटना समोर आली आहे. या प्रकाराचा एक व्हिडिओ देखील आता समोर आला आहे. गावात मानवी वस्तीमध्ये शिरलेला अस्वल पाहून गावकर्यांची घाबरगुंडी उडाली होती. मात्र गावकर्यांनी त्याचा पाठलाग करत त्याला हुसकावून लावल्याने तो पुन्हा जंगलात गेला आहे.
कवितेमध्ये, सिनेमामध्ये हाच 'भालू' म्हणजे अस्वल पहायला अगदी गोंडस वाटतो पण वास्तवात त्याला समोर पाहून अनेकांची घाबरगुंडी उडाल्याचं चित्र आहे. ANI ने प्रसिद्ध केलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये झाडा-झुडपातून अस्वल घरात प्रवेश करतो त्यानंतर तेथून बाहेर पडून तो रस्त्यावर पळताना दिसत आहे. अस्वलाला हुसकावून लावण्यासाठी गावकरी देखील पळापळ करत आहेत. Leopard spotted in Thane: ठाण्यातील सत्कार हॉटेलच्या बेसमेंटमध्ये सापडला बिबट्या; जेरबंद करण्यात यश (Video)
ANI Video
#WATCH Maharashtra: A bear entered Girda village in Buldhana, today & escaped to the forest after being chased away by villagers. pic.twitter.com/fetGOvMzcQ
— ANI (@ANI) July 26, 2019
मुंबईच्या अनेक रहिवाशी सोसायटीमध्ये, ठाण्यात कोरम मॉलमध्ये मानवी वस्तीमध्ये बिबट्या शिरला होता.