भारतामध्ये कोविड 19 लसीकरणाला (Covid 19 Vaccination) सुरूवात होऊन आता महिना होण्यास आला आहे. देशामध्ये पहिल्या टप्प्यांत आरोग्य कर्मचारी, डॉक्टर, पोलिस यांना लस दिली जात आहे. लवकरच 50 वर्षावरील सहव्याधी असणार्यांना कोविड 19 लस दिली जाणार आहे. मात्र याकाळात अनेक कोविड योद्धे देखील घाबरून लसीकरणापासून दूर राहत असल्याचं काही ठिकाणी चित्र आहे. दरम्यान कोविड योद्धांसोबतच नागरिकांच्या मनातील हीच भीती दूर करण्यासाठी मध्य प्रदेशच्या इंदौर (Indore) मधील एक पोलिस कॉन्स्टेबल चक्क 'यमराजा'च्या (Yamraj) वेशभूषेमध्ये कोविड 19 ची लस घेण्यासाठी पोहचला आहे.
जवाहर सिंह हा पोलिस कॉन्स्टेबल आहे. तो इंदौर मधील एमजी रोड पोलइस स्टेशन मध्ये काम करतो. त्याने यमराजाच्या वेशभूषेमागील कारण देताना प्रत्येक फ्रंटलाईन वर्कर ने कोरोना वॅक्सिन लावून घेणं गरजेचं असल्याचं म्हटलं आहे. आपण कोविड 19 लसीच्या मदतीनेच कोरोनाला हरवू शकतो. Lockdown काळात लोकांना घरी राहण्यासाठी स्वतः Coronavirus, यमराज आणि चित्रगुप्त करतायत आवाहन; जाणून घ्या आंध्रप्रदेश पोलिसांची हटके Trick.
जवाहर सिंह कोविड 19 लस घेताना
Madhya Pradesh: Donning the garb of 'Yamraj', a policeman took COVID-19 vaccine in Indore yesterday to spread the message that every frontline worker should take COVID-19 vaccine when their turn comes. pic.twitter.com/61rVcOkMmX
— ANI (@ANI) February 11, 2021
भारतामध्ये आता काही प्रमाणात कोरोना स्थितीवर नियंत्रण मिळवण्यास यश आलं आहे. केंद्र सरकारच्या आरोग्य मंत्रालयाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, बुधवारी 33 राज्य आणि केंद्र शासित प्रदेशामध्ये लसीकरणाची मोहिम सुरू आहे. बुधवार, 10 फेब्रुवारी 2021 ला 2,15,133 जणांना कोविड लस देण्यात आली आहे. आतापर्यंत देशात एकूण 68 लाखांपेक्षा अधिक आरोग्य कर्मचारी, फ्रंट लाईन वर्कर्सना कोविड 19 लसचा पहिला डोस देण्यात आला आहे.