Video Of Devotee Dies Before Sai Baba Idol: साईबाबा चरणी भक्ताला मृत्यू; दर्शन घेताना हृदयविकाराचा झटका, CCTV Footage व्हायरल
Devotee Dies Before Sai Baba Idol | (Photo Credit - Twitter)

साईबाबा मूर्तीचे दर्शन घेत असताना एका भक्तासोबत झालेल्या दुर्दैवी घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर असंख्य युजर्सनी शेअर केला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विविध युजर्सकडून शेअर करण्यात येत आहे. व्हायरल झालेल्या या व्हिडिओत पाहायला मिळते आहे की, एका साईबाबा यांच्या मूर्तीचे दर्शन (Video Of Devotee Dies Before Sai Baba) घेताना हृदयविकाराचा झटका (Heart attack) आल्याने मृत्यू झाला आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडिओची लेटेस्टली मराठी पुष्टी करत नाही. ही घटना मध्य प्रदेश (Madhya Pradesh) राज्यातील कटनी (Katni district) जिल्ह्यात घडल्याचा दावा करण्यात येत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या सीसीटीव्ही फुटेज व्हिडिओत पाहायला मिळते की, एका मंदिरात भाविक देवाच्यामूर्तीचे दर्शन घेत आहेत. इतर भाविकांप्रमाणेच एक व्यक्ती मूर्तीचे दर्शन घेत आहे. दरम्यान, दर्शन घेतानाच ही व्यक्ती जमीनीवर पडते. जिथे तिचा कथीतरित्या मृत्यू झाला आहे. सुरुवातीला संबंधित व्यक्ती मूर्तीचे दर्शन घेत आहे की एकाच ठिकाणी स्तब्ध आहे हे कोणालच कळत नाही. विशिष्ट अवस्थेत ही व्यक्ती एकाच ठिकाणी राहिल्याने उपस्थित भाविकांना संशय आला. ज्यामुळे त्याला आवाज दिला असता कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. सोशल मीडियावर अनेक युजर्सनी शेअर केलेल्या व्हिडिओत दावा केला जात आहे की, साईबाबा मूर्तीचे दर्शन घेत असताना या व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. राकेश असे या व्यक्तीचे नाव असल्याची प्राथमिक माहिती आहे.

या व्यक्तिच्या मृत्यूनंतर सोशल मीडियावर अनेक तर्कवितर्क आणि दावे केले जात आहेत. त्यापैकी काहींचे म्हणने असे की, साईबाबांच्या चरणी त्यांचा मृत्यू झाल्यामुळे या व्यक्तिला मोक्ष किंवा स्वर्ग प्राप्त होईल, असा दावा सोशल मीडियावर अनेकजण करतात. (हेही वाचा, Tej Pratap Yadav on Sai Baba: तेजप्रताप यादव यांना साईबाबांचा चमत्कार? टीव्ही पाहिल्यानंतर टेबलवर सापडले भस्माचे पाकीट; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या)

व्हिडिओ

दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीनंतर निरोगी वाटणारे बरेच लोक अचानक हृदयविकाराने मरण पावले. यामध्ये सिद्धार्थ शुक्ला आणि कॉमेडियन राजू श्रीवास्तव या कलाकारांचा समावेश आहे. लाइव्ह कॉन्सर्टमध्ये परफॉर्म करताना गायक केकेचाही मृत्यू झाला.