Tej Pratap Yadav on Sai Baba: तेजप्रताप यादव यांना साईबाबांचा चमत्कार? टीव्ही पाहिल्यानंतर टेबलवर सापडले भस्माचे पाकीट; काय आहे संपूर्ण प्रकरण? जाणून घ्या
रात्री शिर्डी वाले साईबाबांची मालिका पाहत असताना हा चमत्कार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे.
Tej Pratap Yadav on Sai Baba: आपल्यासोबत चमत्कार घडल्याचा दावा बिहारचे वन आणि पर्यावरण मंत्री तेज प्रताप यादव (Tej Pratap Yadav) यांनी केला आहे. रात्री शिर्डी वाले साईबाबांची मालिका पाहत असताना हा चमत्कार घडल्याचं त्यांनी सांगितलं आहे. तेज प्रताप यादव यांनी सांगितल की, मी टीव्हीवर साईबाबा मालिका पाहत होतो. बाबांचे स्मरण करून त्यांना साई बाबांचे आशीर्वाद मिळावेत अशी त्यांनी इच्छा व्यक्त केली. त्यानंतर बुधवारी ते त्यांच्या घरी बांधलेल्या कार्यालयात गेले असता त्यांना टेबलावर साईबाबांच्या भभूताचे (भस्म) पाकीट आढळून आले. हे पाहून ते थक्क झाले. तेज प्रताप यांनी साई बाबा आणि भगवान श्रीकृष्ण यांचा त्यांच्यावर आशीर्वाद असल्याचे वर्णन केले.
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव (RJD supremo Lalu Prasad Yadav) यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव याने एका व्हिडिओमध्ये सांगितले की, ते त्यांच्या घरी साई बाबांची मालिका पाहत होते. साई बाबा लोकांचे आजार आणि समस्या भभूताने दूर करत असल्याचे दाखवले जात होते. तेज प्रतापने बाबांचे मनापासून स्मरण केले आणि हे भभूतही त्यांना भेटावेत अशी इच्छा व्यक्त केली. साईबाबा खरोखर चमत्कार करतात की नाही हे त्यांना पाहायचे होते. (हेही वाचा - Fever Medicine Found Poor Quality: कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर अनेक कंपन्यांचे तापाचे औषधही चाचणीत फेल; 'या' गोळ्या खाण्यापूर्वी नाव पहा)
यानंतर ते दुसऱ्या दिवशी घरी बनवलेल्या कार्यालयात आले असता त्यांना टेबलावर भभूत पडलेले दिसले. तेज प्रताप म्हणतात की, हा साई बाबांचा चमत्कार आहे. त्यांनी मनातल्या मनात भभूताची इच्छा व्यक्त केली आणि दुसऱ्या दिवशी ती त्यांना ऑफिसमध्ये भेटली. तेज प्रतापच्या म्हणण्यानुसार, त्यांनी आयुष्यात असा चमत्कार यापूर्वी कधीच पाहिला नव्हता.
बिहार के मंत्री तेज प्रताप यादव का दावा... शिरडी के साईं बाबा को याद किया और सोचा उनका भभूत मिल जाए. घर पर अपने ऑफिस में गया तो टेबल पर मिला भभूत का पैकेट. @TejYadav14
Video- @iajeetkumar pic.twitter.com/Ke7vrsbQjv
— Shubham (@Shubhamsc_) October 13, 2022
मंत्री तेज प्रताप यादव पुढे बोलताना म्हणाले की, ते शिर्डीच्या साई ट्रस्टचे सदस्य आहेत. त्यांचे वडील लालू प्रसाद यादव हे देखील सदस्य आहेत, पण त्यांनी कधीही भभूत विकत घेतले नाही. तेज प्रताप म्हणाले की, शिर्डीच्या साईबाबांचे भस्म लावल्याने प्रत्येक रोग, प्रत्येक रोग नाहीसा होतो, अशी श्रद्धा आहे. त्यामुळे त्यांनाही साईबाबांचे भभूत प्राप्त व्हावेत, अशी इच्छा त्यांना व्यक्ती केली. आणि त्यांना शिर्डीच्या साईबाबांनी त्यांच्या टेबलावर भभूतांची दोन पाकिटे ठेवली. तेज प्रताप यादव याला साई बाबांचा चमत्कार मानत आहेत.
(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2022 02:21 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

