Fever Medicine Found Poor Quality: कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर अनेक कंपन्यांचे तापाचे औषधही चाचणीत फेल; 'या' गोळ्या खाण्यापूर्वी नाव पहा

अधिनियम 140. कलम 17B(E) अंतर्गत 'संशयास्पद' मोहालीस्थित औषध कंपनीचे ऑफलोक्सासिन आणि ऑर्निडाझोल अँटीबायोटिकचे नमुनेही चाचणीत उत्तीर्ण झाले नाहीत.

Fever Medicine Found Poor Quality: कफ सिरपमुळे मृत्यू झाल्याच्या आरोपानंतर अनेक कंपन्यांचे तापाचे औषधही चाचणीत फेल; 'या' गोळ्या खाण्यापूर्वी नाव पहा
Drug | (Photo Credit: Archived, edited, representative images)

Fever Medicine Found Poor Quality: आफ्रिकन देश गाम्बियामध्ये एका भारतीय औषध कंपनीचे खोकल्याचे सिरप प्यायल्याने 66 मुलांचा मृत्यू झाल्याच्या आरोपादरम्यान देशात आणखी काही औषध कंपन्यांचे नमुने निकामी असल्याचं समोर आलं आहे. सेंट्रल ड्रग्ज स्टँडर्ड कंट्रोल ऑर्गनायझेशन (CDSCO) ने गेल्या महिन्यात जारी केलेल्या अहवालानुसार सुमारे 45 औषधांचे नमुने निकृष्ट दर्जाचे असल्याचे आढळून आले. अयशस्वी नमुन्यांपैकी 13 हिमाचल प्रदेशातील उत्पादन युनिटमधील आहेत. ज्या औषधांचे नमुने अयशस्वी झाले आहेत त्यात पॅरासिटामॉलचा समावेश आहे, जे जास्त प्रमाणात वापरले जाते.

'द ट्रिब्यून' मधील वृत्तानुसार, या वर्षी मे महिन्यात, सहाय्यक औषध नियंत्रक आणि परवाना प्राधिकरण, नवी दिल्ली यांनी ग्लेनमार्क फार्मास्युटिकल्स लिमिटेड आणि त्यांच्या टेलमिसार्टन (रक्तदाबासाठी वापरल्या जाणार्‍या) औषधांविरुद्ध ड्रग्ज आणि कॉस्मेटिक्स अंतर्गत तपास सुरू केला होता. अधिनियम 140. कलम 17B(E) अंतर्गत 'संशयास्पद' मोहालीस्थित औषध कंपनीचे ऑफलोक्सासिन आणि ऑर्निडाझोल अँटीबायोटिकचे नमुनेही चाचणीत उत्तीर्ण झाले नाहीत. (हेही वाचा - Tele MANAS: केंद्र सरकारकडून 24×7 टेली-मानसिक आरोग्य सेवेला सुरुवात, मानसिक आरोग्याविषयी जागृकता निर्माण करणारी अनोखी सेवा)

'या' औषधांचे नमुने चाचणीत अपयशी -

Methycobalamin, Alpha Lipoic acid- USV Pvt Ltd. Baddi

Paracetamol Tablets - T&G Medicare, Baddi

Paracetamol Tablets- Alco Formulation, Faridabad

Paracetamol Tablets- ANG Lifesciences, Solan

Chlordiazepoxide- Wockhardt, Nalagarh

Amoxicillin-Potassium Clavulanate- Mediwell Bioteh solan

Vitamin D3 Chewable tablets- Maxtar Biogenics, Nalagarh

Ofloxacin and Ornidazole tablets- Amkon Pharmaceuticals, Mohali

Lvermectin dispersible Tablets- Plena Remedies, Baddi

Itraconazole Capsules- Theon Pharmaceuticals, Baddi

Gentamicin Injection- BM Pharmaceuticals, Chandigharh

Mefenamic acid tablets- Navkar Lifesciences, Baddi

Aluminium hydroxide- Biogenetic Drugs Pvt Ltd. Baddi

चंडीगढ-आधारित औषध कंपनीने बनवलेले अँटिबायोटिक जेंटॅमिसिन इंजेक्शन, जिवाणू एंडोटॉक्सिन आणि स्टेरिलिटी चाचण्या पास करण्यात अयशस्वी झाले. अलीकडेच, हिमाचलमधील काला एमबीच्या निक्सी लॅबोरेटरीजचे एक औषध, ऍनेस्थेसिया प्रोपोफोल, गुणवत्तेच्या चाचणीत अयशस्वी झाल्यामुळे स्कॅनरखाली आले. पाच रुग्णांच्या मृत्यूनंतर चंदिगड पीजीआयएमईआर येथील आपत्कालीन वॉर्डमधून नमुना गोळा करण्यात आला. या सर्व रुग्णांना शस्त्रक्रियेपूर्वी हे उपशामक औषध देण्यात आले होते. हिमाचलच्या फार्मास्युटिकल कंपनीला या बॅचची सर्व औषधे मागे घेण्यास सांगण्यात आले.

(The above story first appeared on LatestLY on Oct 13, 2022 12:58 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).