Madhya Pradesh Couple Takes Wedding Pheras in Ratlam Wearing PPE Kits (Photo Credits: ANI)

प्रेमाला कशाचच बंधन नसतं मग त्याला या कोरोना संकट तरी कसं बंधन असून शक्तं. लग्नाआधी काही दिवस मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) रतलममध्ये (Ratlam) नवरदेवच कोरोनाबाधित असल्याचं समजलं पण या जोडप्याने लग्न लांबणीवर टाकण्याऐवजी पीपीई कीट्स घालून लग्न पार पाडण्याचं ठरवलं. या जोडप्याने सप्तपदी देखील पीपीई कीट्स घालून घेतल्याचं पहायला मिळालं आहे. हा विवाह सोहळा काल (26 एप्रिल) दिवशी पार पडला आहे.

मीडीया रिपोर्ट्स नुसार नवरदेवाचा 19 एप्रिलला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. मात्र स्थानिक प्रशासनाची परवानगी घेत या जोडप्याने लग्न करण्याचा निर्णय घेतला. मंगलकार्यात हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला स्थानिक पोलिस आणि जोडप्याचे कुटुंबीय देखील उपस्थित होते. रतलामचे तहसीलदार नवीन गार्ग यांनी ANIला दिलेल्या माहितीनुसार, 'प्रशासनाला जेव्हा समजलं की नवरदेव कोविड पॉझिटीव्ह आहे आणि तो लग्नासाठी मंगलकार्यालयात पोहचला आहे तेव्हा प्रशासन तातडीने हे लग्न थांबवण्यासाठी पोहचले पण नातेवाईकांनी विनवणी केली आणि हा छोटेखानी विवाहसोहळा पोलिस कर्मचार्‍यांच्या उपस्थितीमध्ये पार पडला.' Malaysia: भव्य विवाह सोहळ्यास सामील झाले तब्बल 10 हजार पाहुणे; सरकारची 'ना हरकत' मिळवण्यासाठी वापरली 'ही' भन्नाट आयडिया.

पहा व्हिडिओ

भारतामध्ये सध्या वाढती कोरोना रूग्णसंख्या पाहता नियम कडक करण्यात आले आहेत. आरोग्य मंत्रालयाकडून फार गरजेचे नसेल तर घराबाहेर न पडण्याच्या सूचना केल्या आहेत. तसेच आता घरामध्येही मास्क घालून राहण्याची वेळ आली आहे असे सांगितले आहे. महाराष्ट्रात सध्या कोविडच्या ब्रेक द चेन नियमावली अंतर्गत केवळ 25 लोकांच्या उपस्थितीला परवानगी देण्यात आली आहे.