बास्केटबॉल (Basketball) खेळणारी मुलं/मुली तुम्ही पाहिली असतील. पण तुम्ही कधी पक्षांना बास्केटबॉल खेळताना पाहिले आहे का? याचे उत्तर नक्की नाही असे असेल. परंतु, एक क्युट व्हिडिओ समोर आला आहे. यात चिमुकले पक्षी (Little Birds) बास्केटबॉल खेळताना दिसत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ जोरदार व्हायरल (Viral Video) होत आहे. हा व्हिडिओ अमेरिकेचा माजी बास्केटबॉल प्लेयर रॅक्स चॅपमॅन (Rex Chapman) याने ट्विटरवर शेअर केला आहे.
रॅक्स चॅपमॅन ने हा व्हिडिओ शेअर करताना लिहिले की, तुम्ही कधी पक्षांना बास्केटबॉल खेळताना पाहिले आहे का? आज स्कोल करुन नक्की पहा. हा व्हिडिओ आज म्हणजेच 28 जानेवारी रोजी शेअर करण्यात आला असून त्याला आतापर्यंत 6.8 लाख व्हूज मिळाले आहेत. 6.1 हजार लोकांनी यावर आपली प्रतिक्रीया नोंदवली असून 19.4 हजारहून अधिक लाईक्स मिळाले आहेत. हा व्हिडिओ सर्वांच्याच पसंतीस उतरला असून वारंवार तो पाहिल जात आहे. (आकाशात उंच उडणाऱ्या गरुडाने समुद्रातील माशाची अशी केली शिकार; पहा थक्क करणारा Video)
पहा व्हिडिओ:
If you’ve already seen some birds playing basketball today just keep on scrolling...pic.twitter.com/dljTuTieU9
— Rex Chapman🏇🏼 (@RexChapman) January 27, 2021
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकाल की, 5 चिमुकल्या पक्ष्यांमध्ये बास्केटबॉलचा सामना रंगला आहे. दोन्ही बाजूला छोटेस बास्केट ठेवून लहानसा बॉल त्यांना देण्यात आला आहे. त्यानंतर पक्षी धावत जावून चोचीत बॉल पकडत आहेत आणि बास्केटमध्ये टाकत आहेत. पक्षी बास्केटबॉलचा आनंद घेत असून सोशल मीडिया युजर्स देखील हा क्युट व्हिडिओ पाहून आनंदून गेले आहेत.