लता मंगेशकर यांचे हॉस्पिटल मधील फोटो होत आहेत Viral; पाहून तुम्हालाही वाटेल त्यांच्या प्रकृतीची काळजी
Lata Mangeshkar (Photo credits: Wikimedia Commons/ Bollywood Hungama)

Lata Mangeshkar's Photos From Hospital: भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) या तब्बल 28 दिवस रुग्णालयात उपचार घेऊन रविवारी घरी परतल्या. त्या रुग्णालयात असताना त्यांना व्हेंटिलेटरवर देखील ठेवण्यात आलं असल्याचं त्यांच्या डॉक्टरांनी माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. आता मात्र लता दीदींवर उपचार सुरु असतानाच एक फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यांची फोटोतील झलक पाहून, त्यांच्या अनेक चाहत्यांनी त्यांच्याबद्दल चिंता व्यक्त केली आहे.

फोटोमध्ये आपल्याला लता दीदी व्हीलचेयरवर बसलेल्या दिसत आहे. त्यांच्या अंगावर पांढऱ्या रंगाची शॉल घालण्यात आली आहे. तर वयवर्ष नव्वद असणाऱ्या लता दीदींच्या चेहऱ्यावर सुरकुत्या दिसत आहेत. तसेच या फोटो त्यांच्या मागे तीन नर्स देखील आपल्याला पाहायला मिळतात.

दरम्यान, लतादीदींना निमोनियाची लागण झाल्यामुळे 11 नोव्हेंबरला रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यांना श्वसनाचा त्रास जाणवत होता आणि त्यामुळेच त्यांना मुंबईतील ब्रीज कँडी रुग्णालयात भरती करण्यात आले होते.

'लता मंगेशकर यांना रुग्णालयात आणलं, तेव्हा त्यांना बरं करणं आमच्यासाठी फार कठीण होतं,' लता दीदींच्या डॉक्टरांनी अशी दिली प्रतिक्रिया

मात्र रविवारी घरी परतल्यावर, लता मंगेशकर यांनी स्वतः ट्विट करत आपली प्रकृती आता स्थिर असल्याचे त्यांच्या चाहत्यांना सांगितले. त्या लिहितात, "गेल्या 28 दिवसांपासून मी ब्रीच कँडी रुग्णालयात होते. मला न्युमोनिया झाला होता. मी पूर्ण बरी होऊन घरी जावं ही डॉक्टरांची इच्छा होती. आज मी घरी आले. देव, माई- बाबा यांचे आशीर्वाद, तुम्हा सर्वांच्या प्रार्थना आणि प्रेमामुळे मी आता ठीक आहे. मी तुम्हा सर्वांची आभारी आहे."