Largest Ever Purple-Pink Diamond: सर्वात मोठ्या पर्पल पिंक डायमंड 'द सकुरा' चा 213 कोटींना लिलाव; हिऱ्यांची चमक पाहुन व्हाल अचंबित
Largest Ever Purple-Pink Diamond The Sakura (Photo Credits: Twitter)

सर्वात मोठा पर्पल पिंक डायमंड (Largest Ever Purple-Pink Diamond) 'द सकुरा' (The Sakura) चा 213 कोटींना लिलाव झाला आहे. 15.81 कॅरेटचा हा हिरा असून लिलावत विकला गेलेला हा सर्वात महागडा हिरा ठरला आहे. 23 मे रोजी क्रिस्टी च्या  हांगकांग मैग्निफिसेंट ज्वेल्स लाईव्ह ऑक्शनमध्ये (Christie’s Hong Kong Magnificent Jewels Live Auction) याचा लिलाव झाला. प्लॅटिनम आणि सोन्यापासून बनलेल्या डायमंड रिंगला द सकुरा असे नाव देण्यात आले आहे. जपानी शब्द चेरी ब्लॉसम वरुन हे नाव देण्यात आले आहे. सकुरा म्हणजे चेरी ब्लॉसम. वसंत ऋतुत अत्यंत कमी कालावधीसाठी हा खुलतो. ऑक्शन हाऊस क्रिस्टीनुसार, हा हिरा दुर्लभ असून यात ऑप्टिकल ट्रॉन्सपरन्सी आहे. छान रंग आणि मोठा आकार हे त्याचे वैशिष्ट्यं आहे. आशियातील एका खाजगी खरेदीकर्त्याने हा हिरा खरेदी केला आहे. मात्र लिलाव करणाऱ्यांनी याबद्दल अधिक माहिती दिलेली नाही.

दागिन्यांच्या लिलावाच्या इतिहासातील आणखी एक महत्त्वाचा अध्याय पूर्ण केल्याने आम्ही खूप उत्सुक आहोत. द सकुराने विक्रमी किंमत मिळविली. 10 टक्के गुलाबी हिऱ्याचे वजन एक कॅरेटच्या पाचव्या हिस्सापेक्षा अधिक आहे. तर सकुराचे वजन यापेक्षा 8 पट अधिक आहे.  हा फॅन्सी चमकदार जांभळा-गुलाबी हिऱ्याचा आकार अभूतपूर्व आहे. 15.81 कॅरेटचा हा सर्वात मोठा पर्पल पिंक डायमंड असल्याचे लिलावकर्त्यांनी एका निवेदनात म्हटले आहे. (126 हिऱ्यांनी साकारले जगातील सर्वात महागडे लिप आर्ट; किंमत ऐकून थक्क व्हाल!)

पहा व्हिडिओ:

जगातील सर्वात मोठ्या पर्पल पिंक डायमंडला फॅन्सी विविड देखील बोलले जाते. याचा संबंध चमकत्या गुलाबी रंगाशी आहे. जाणकारांनी दिलेल्या माहितीनुसार, कॅरेट अधिक असल्याने वजन वाढते. यासाठी हिऱ्याची क्वॉलिटी, कट आणि क्लिअरिटी चांगली असणे गरजेचे आहे. मागील वर्षी 14.8 कॅरेटचा 'द स्पिरिट ऑफ द रोज' नावाच्या हिऱ्याचा लिलाव झाला. हा हिरा 196 कोटी रुपयांना विकला गेला. मात्र यंदा 'द सकुरा'ने या हिऱ्याचा विक्रम मोडीत काढला.