Naatu Naatu Video | (Photo Credits: Twitter)

एसएस राजामौली (SS Rajamouli) यांनी RRR चित्रपटातील 'नातू नातू' (Naatu Naatu) या गाण्याने सर्वांना आकर्शीत केले. ऑस्कर विजेता राहिलेल्या या गाण्याची क्रेझ अद्यापही कायम आहे. या गाण्याला जगभरातील नागरिकांचे प्रेम मिळत आहे. याचा प्रत्यय कोरियन दुतावासातही पाहायला मिळाला. होय, कोरियन राजदूत (Korean Ambassador) आणि दूतावासातील (Korean Embassy) कर्मचारी 'नातू नातू' वर नृत्य (Korean Dance On Naatu Naatu Song) करत आहेत. या नृत्याचा एक व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनाही प्रतिक्रिया देण्याचा मोह आवरला नाही. अत्यंत जीवंत आणि सामूहीक प्रयत्न असे म्हणत पंतप्रधान मोदींनी या व्हिडिओचे कौतुक केले आहे. केंद्रीय कायदामंत्री किरेन रिजिजू यांनीही या व्हिडिओला खूप सूंदर म्हटले आहे. केंद्रीय क्रीडा मंत्री अनूराग ठाकूर यांनी म्हटले 'अप्रतिम'.

व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता, दोन महिला नाटू नाटू गाण्यावर हुक स्टेप करताना दिसतात. कुर्त्यात असलेल्या या दोन्ही महिला कोरियन कर्मचारी आहेत. याच व्हिडिओत पुढे पाहायला मिळते की, लॉनवर काही लोक याच गाण्याच्या हुक स्टेप करत आहेत. जे कोरियन दुतावसातील कर्मचारी आहेत. त्यांनाही संगीतकार एमएम कीरावानी यांच्या पुरस्कार विजेत्या गाण्याने लक्ष वेधून घेतले आहे. हे लोकही नाटू नाटू गाण्यावर डान्स करत आहेत.

ट्विट

हा व्हिडिओ बराच मनोरंजक झाला आहे. व्हिडिओ जसजसा पुढे सरकतो तसे पुढे दिसते की, दुतासवासातील दोन दूतावास कर्मचारी अभिनेते राम चरण आणि ज्युनियर एनटीआर सारखे कपडे (पांढरे शर्ट आणि सस्पेंडर बेल्टसह राखाडी पँट) घातलेले दिसतात. पुढे काहीच वेळात संपूर्ण दूतावासाचे कर्मचारी फ्लॅश मॉब करण्यासाठी बागांमध्ये जमतात. हा व्हिडिओ सर्वांचे लक्ष वेधून घेतो आहे. शेअर केल्यापासून या व्हिडिओला तीन लाखांहून अधिक व्ह्यूज आणि नऊ हजार लाईक्स मिळाले आहेत.