Kolkata woman argue with police after defying coronavirus lockdown orders (Photo Credits: Twitter)

कोरोना व्हायरसचा वाढता धोका टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. 14 एप्रिल पर्यंत असणाऱ्या या लॉकडाऊनच्या काळात नागरिकांना घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात येत आहे. मात्र तरी देखील नागरिक घराबाहेर पडत रस्त्यांवर गर्दी करताना दिसत आहेत. यासाठी पोलिस तैनात करण्यात आले असून नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांना ताकीद देण्यात येत आहे. तर काही ठिकाणी उठाबश्या काढण्याची शिक्षा देण्यात येत आहे. इतकंच नाही तर वेळ पडल्याच लाठीचा मारही देण्यात येत आहे. कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीतही जीवाची पर्वा न करता पोलिस अहोरात्र काम करत आहे. अशा परिस्थितीत पोलिसांशी अरेरावी करणाऱ्या महिलेचा व्हिडिओ समोर आला आहे. हा व्हिडिओ कोलकता येथील असून ही महिला पोलिसांशी वाद घालताना दिसत आहे. वादात राग अनावर झाल्याने या महिलेने पोलिसांना चावा घेतला आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.

औषधं आणण्यासाठी बाहेर गेल्याचे या महिलेने सांगितले. मात्र बिल दाखवायला सांगितल्यावर तिने पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली. यापूर्वीही लॉकडाऊनच्या काळात अडवल्यामुळे  पोलिसांवर हल्ला केल्याच्या घटना अनेक ठिकाणांहून समोर आल्या आहेत.

पहा व्हिडिओ:

दरम्यान देशात कोरोनाग्रस्तांची संख्या 600 च्या पार गेली आहे. त्यामुळे कोरोना व्हायसरच्या संकटाची गंभीरता लक्षात घेत नागरिकांनी सरकारच्या सूचनांचे पालन करणे, हितावह ठरेल. त्यामुळे अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्यांवरही ताण येणार नाही आणि आपण सुरक्षित राहू.