कोलकाता: 'सरस्वती पूजा सांगा नाहीतर सोडतच नाही!' भक्तांनी पुजाऱ्याला खेचले, ढकलत नेले; व्हिडिओ व्हायरल
Priest in Kolkata | (Photo credit: archived, edited, symbolic images)

वसंत पंचमी (Vasant Panchami) निमित्त सरस्वती (Goddess Saraswati) पूजा सांग नाहीतर सोडतच नाही, असे म्हणत भक्तांनी एका पुजाऱ्यावर जबरदस्तीच केली. भक्तांनी पुजाऱ्यांवर केवळ जबरदस्तीच केली नाही तर, भक्तांनी या पुजाऱ्यास पूजेसाठी सोबत न येणाऱ्या या पुजाऱ्याला चक्क खेचत आणि फरफटत पुजास्थळी नेले. पश्चिम बंगाल राज्यातील कोलकाता येथ हा प्रकार घडला. वसंत पंचमीपासून वसंत ऋतू (Spring Season) आगमन होते. या वेळी सरस्वतीची पूजा करण्याचा पश्चिम बंगाल राज्यात प्रघात आहे. दरम्यान, पूजा सांगण्यासाठी पुजाऱ्याला फरफटत नेल्याचा एक व्हडिओही सोशल मीडियावर (Social Media) व्हायरल झाला आहे.

प्राप्त माहितीनुसार हा व्हिडिओ कोलकाता येथील बेहाला परिसरात घडला. या व्हिडिओत दिसते की, काही लोकांचा समूह पुजाऱ्याला जबरदस्तीने पुजा सांगण्यासाठी घेऊन जात आहेत. जेव्हा पुजारी पुजा सांगण्यासाठी नकार देतो आहे तेव्हा, हा समूह पुजाऱ्याला खेचत आणि फरफटत पूजा स्थळी घेऊन जाताना दिसतो आहे.

व्हिडिओमध्ये असेही दिसते आहे की, काही मुले आणि महिला या पुजाऱ्याला जबरदस्तीने घेऊन जात आहेत. पुजारी या लोकांना मी पुजा सांगण्यासाठी येऊ शकत नाही, असे वारंवार सांगतो आहे. परंतू, उपस्थित मंडळी त्याचा विरोध किंवा इतर विचारांकडे लक्षच देण्यास तयार नसल्याचे दिसते. अखेर आक्रमक समूहापुढे पुजारी हतबल झालेला पाहायला मिळतो. तसेच, तो नाईलाजाने का होईना पूजा संगण्यास तयार झाल्याचेही दिसते. (हेही वाचा, Vasant Panchami 2020 Images: सरस्वती पूजनाच्या शुभेच्छा देणारे मराठी Messages, HD Images, Greetings, WhatsApp Status च्या माध्यमातून साजरी करा यंदाची वसंत पंचमी)

फेसबुक पोस्ट

दरम्यान, पुजाऱ्याचे नाव अद्याप पुढे आले नाही. मात्र, उपस्थीत समुहासोबत जाऊन पुजारी एका बंद खोली गेलेला दिसतो. जिथे सरस्वतीची मूर्ती आगोदरच प्रतिष्ठापीत केल्याचे पाहायला मिळते. पुजारी आल्याचे पाहून उपस्थित मंडळींनी जल्लोष केल्याचा प्रकारही दिसतो. विशेष म्हणजे पुजा सांगताना पुजारी मधेच निघून जाऊ नये म्हणून खोलीचा दरवाजा बंद करण्याची खबरदारीही संबंधित मंडळींनी घेतली आहे.