Venomous Snake Video: राजस्थान (Rajasthan) राज्यातील कोटा (Kota) येथे एक धक्कादायक घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे. दुकान सुरु होते. कामगार काम करत होते. दरम्यान, एक भलादांडगा किंग कोब्रा (King Cobra) दुकानातील बेडच्या उशीखाली आढळून आला. अचानक साप पाहिल्यावर कामगारांची चांगलीच घाबरगुंडी उडाली. सोशल मीडियावर शेअर झालेल्या व्हिडिओमध्ये साप दुकानात जाताना आणि उशीखाली लपताना स्पष्ट दिसतो आहे. प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, कोटा जिल्ह्यातील भामाशाह मंडी येथे ही घटना घडली. दुकानात झोपलेल्या एका कामगाराला बेडवर त्याच्या उशीखाली काहीतरी वळवळत असल्याचे जाणवले. त्यामुळे त्याने उशी हालवली आणि थोडी उचलली तर त्याखाली भलताच मोठा नाग (किंग कोब्रा) आढळून आला. एक मोठा कोब्रा दिसल्याने तो माणूस घाबरला.
दुकानातील इतरही कामगार साप पाहून घाबरले. त्यांनी लगेचच इतर कामगारांना दुकानाबाहेर बोलावले. तसेच, तातडीने सर्पमित्रांना फोन केला आणि साप पकडण्यासाठी यंत्रणा सक्रीय केली. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक सर्पमित्र सापाला यशस्वीरित्या पकडत आहे आणि एका गोणपाटात भरत आहे.
सर्पमित्रांने स्थानिक प्रसारमाध्यमांना बोलताना सांगितले की, प्रचंड उष्णता आणि आर्द्रतेमुळे साप त्यांच्या बिळांतून बाहेर पडतात. काहीवेळा भक्षाच्या शोधात लोकवस्तीच्या भागात जातात. असे काही प्रदेशांमध्ये नेहमी घडते. काही प्रदेशांमद्ये क्वचित. लोकांनी किंग कोब्रासारख्या विषारी सापांपासून सावध राहिले पाहिजे. व्यक्तीचे प्राण जाण्यासाठी विषारी सापाचा एक चावा पुरेसा आहे. वनविभागाच्या अधिकाऱ्याने सांगितले की, सापाला पकडल्यानंतर त्याला त्याच्या नैसर्गिक आदिवासात सोडण्यात आले. नागरिकांनी साप लोकवस्तीत आढळून आले तर तातडीने वन विभागाशी संपर्क साधावा असे अवाहनही त्यांनी केले.
ट्विट
Panic after locals spot cobra at a shop in Rajasthan's Kota. There were a dozen employees at the shop while the cobra was found.#Rajasthan #Kota pic.twitter.com/SPSjPAy2bL
— Vani Mehrotra (@vani_mehrotra) August 25, 2023
किंग कोब्रा प्रजातीच्या सापाला मराठीत नागराज असेही संबोधले जाते. हा एक विषारी साप म्हणून ओळखला जातो. नागराज (किंग कोब्रा / ओफिओफॅगस हॅना) हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. त्याची लांबी 5.6 मीटर पर्यंत असू शकते. सापाची ही प्रजाती आग्नेय आशिया आणि भारताच्या काही भागात खूप सामान्य आहे. हा आशियातील सर्वात धोकादायक सापांपैकी एक आहे.