Photo Credit: Twitter

हत्तींचे असंख्य व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात जे त्यांची एकता त्यांची समजूतदारपणा दर्शवितात. यासह तुम्ही हत्तींच्या रागाचे व्हिडिओही पाहिले असतील आणि हत्ती चिखलात अनेकदा अडकलेले ही पाहिले असतील. सध्या सोशल मीडियावर हत्तीचा व्हिडिओ व्हायरल होत असून त्या चिखलात अडकलेला आहे आणि वनविभागाच्याअधिकाऱ्यांनी त्याला वाचवले.या आठवड्याच्या सुरुवातीला ही घटना कर्नाटकमधील कूरग येथे घडली जिथे एका खड्ड्यात अडकलेल्या हत्तीला वन अधिकाऱ्यांनी वाचवले. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. साराभाई विरुद्ध साराभाई अभिनेता सतीश शहा (Satish Shah) यांनी बुधवारी ट्विटरवर 2 मिनिटांची क्लिप पोस्ट केली आणि हत्तीची सुटका केल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले आहे. (Python Eats Alligator Video: अवघ्या काही मिनिटातच अजगराने एलीगेटरला गिळून टाकले; व्हिडिओ पाहून तुम्हालाही फुटेल घाम )

हा व्हिडिओ भारतीय वनसेवा अधिकारी सुधा रामेन यांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यासह त्यांनी कॅप्शन लिहिले आहे. कुर्ग येथून हत्ती बचाव ऑपरेशन. प्रत्येक ऑपरेशन प्राणी आणि इतर घटकांवर अवलंबून बदलते. प्राण्यांची सुरक्षा महत्त्वपूर्ण आहे. फटाका का उकडला गेला? जनावरांना जंगलात निर्देशित करणे जेणेकरुन ताणतणावामुळे कोणावरही हल्ला करु नये. या व्हिडिओ ला आतापर्यंत 90.7K व्यूज मिळाले आहेत, तर आतापर्यंत 281 रिट्वीट आणि लाइक्स मिळाले आहेत. (Baby Giraffe Viral Video: नवजात बेबी जिराफ जेव्हा जन्मानंतर पहिलं पाऊल टाकण्याचे प्रयत्न करतो... पहा सोशल मीडीयात वायरल होत असलेला हा हृद्यस्पर्शी व्हिडीओ )

असे सांगितले जात आहे की, चुकून एक हत्ती खड्ड्यात पडला आणि त्यातून बाहेर पडणे त्याला फार अवघड होते, कारण खड्डा चिखलात भरला होता. चिखलामुळे तो सतत घसरत होता. या घटनेची माहिती मिळताच वनविभागाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी या मोठ्या प्राण्याला वाचवण्यासाठी जेसीबी लोडरचा वापर केला आणि बऱ्याच प्रयत्नानंतर हत्तीला बाहेर काढण्यात यश आले.