जन्मानंतर मनुष्याच्या बाळाला पहिलं पाऊल टाकत चालण्याची प्रक्रिया गाठण्याची अनेक महिन्यांचा वेळ लागतो. पण प्राण्यांच्या आयुष्यात तसं नसतं. अनेकदा जन्मानंतर लगेजच ते चालताना, बागडताना आपण पाहिलं आहे. सध्या असाच एका जिराफाचा व्हिडीओ सोशल मीडियामध्ये वायरल होत आहे. यामध्ये जन्मानंतर लगेजच जिराफाचं इवलस पिल्लू दुडूदुडू चालताना दिसत आहे. हा व्हिडिओ 'ए पेज टू मेक यू स्माइल अगेन' या ट्वीटर अकाऊंट द्वारा शेअर करण्यात आला आहे.
हॉपकिंस बीआरएफसी ने या व्हिडीओच्या कॅप्शन मध्ये बेबी जिराफचं पहिलं पाऊल असं कॅप्शन दिलं आहे. हा व्हिडिओ 2 मे ला शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत त्याला 30.1k व्ह्यूज मिळाले आहेत. तर 324 रिट्वीट्स आणि 2035 लाईक्स आहेत. सध्या सोशल मीडीयामध्ये हा गोंडस व्हिडिओ नेटकर्यांचं मन जिंकत आहे. (नक्की वाचा: Giraffe Viral Video: दक्षिण आफ्रिकेत माऊंटन बायकरला Safari Park मध्ये जिराफ जेव्हा सुंगतो... पहा हा वायरल व्हिडिओ).
पहा व्हिडिओ
First steps of a baby giraffe pic.twitter.com/n4NDSHZdJB
— ❤️A page to make you smile again ❤️ (@HopkinsBRFC) May 2, 2021
सुमारे 22 सेकंदाच्या या व्हिडिओला एका चिडिया घरामध्ये शूट करण्यात आले आहे. ज्यात बेबी जिराफ जन्मानंतर चालण्यासाठी पहिलं पाऊल टाकण्याचा प्रयत्न करत आहे. उठण्याचा प्रयत्न करत आहे पण त्याला ते जमत नाही. तो बेबी जिराफ सारखा सारखा तो प्रयत्न करत आहे. यामध्ये या जिराफच्या आईसोबतचे देखील काही क्षण आहे.