कर्नाटक मध्ये भाजपाच्या MLA Basavaraj Dadesugur यांच्या लेकाने iPhone ने कापला बर्थ डे केक; 'संपत्ती प्रदर्शना'चा संतापजनक प्रकार (Watch Video)
आयफोन ने कापला केक । PC: Twitter/ @Csoumya21 (Screengrab From Video)

कर्नाटकच्या (Karnataka) भाजपा आमदाराच्या मुलाचा एक प्रताप एक वेळच्या जेवणासाठी झटणार्‍या अनेकांच्या जखमेवर मीठ चोळणारं आहे. Kanakagiri (Koppal)चे भाजपा आमदार MLA Basavaraj Dadesugur यांच्या मुलाने चक्क आयफोनने बर्थ डे केक कापल्याचा प्रकार समोर आला आहे. MLA Basavaraj Dadesugur यांच्या मुलाचं नाव सुरेश आहे. मित्रांसोबत बर्थ डे सेलिब्रेशन करणार्‍या सुरेशचा व्हिडिओ सोशल मीडीयात वायरल झाला आहे.

15 सेकंदाच्या वायरल व्हिडिओ मध्ये सुरेश दोन ओळींमध्ये ठेवलेल्या केक वर आयफोन फिरवत तो कापल्याचं पहायला मिळत आहे. यामध्ये सुरेश या नावाच्या इंग्रजीमधील प्रत्येक अक्षराचा एक केक आहे. दरम्यान सुरेश हा प्रकार करताना त्याच्या आजूबाजूची लोकं आनंद व्यक्त करताना दिसत आहेत, ऐकायला येत आहेत.

सुरेशच्या बर्थ डे सेलिब्रेशनचा व्हिडिओ

सुरेशचा व्हिडीओ जसा वायरल झाला तशा लोकांच्या संतापजनक प्रतिक्रिया देखील समोर आल्या आहेत. स्थानिक कॉंग्रेस नेत्यांनी हा प्रकार म्हणजे 'संपत्तीचं संतापजनक प्रदर्शन' असल्याचं म्हटलं आहे. कोरोना जागातिक महामारी आणि देशाची आर्थिक प्रगती खालावत असताना असं वागणं म्हणजे गरीब आणि अन्नासाठी वणवण करणार्‍यांचा अपमान असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. नक्की वाचा: Aurangabad: लग्नाचा वाढदिवस पडला महागात, बायकोसमोर 'हे' कृत्य करणाऱ्या नवऱ्याला पोलिसांनी ठोकल्या बेड्या.

firstpost च्या रिपोर्ट्सनुसार, MLA Basavaraj Dadesugur यांनी त्यांच्या मुलाला पाठीशी घातलं आहे. त्यांनी प्रतिक्रिया देताना 'सुरेशने त्याचा बर्थ डे त्याने कमावलेल्या पैशातून साजरा केला असल्याचं' म्हटलं आहे. कोरोना संकट असल्याने हाताचा वापर करण्यापेक्षा त्याने आयफोन वापरला असल्याचं म्हटलं आहे.