औरंगाबाद (Aurangabad) येथे लग्नाच्या वाढदिवशी बायकोसमोर फुशारकी मारण्याचा सोस एका तरूणाचा अंगलट आहे. लग्नाचा वाढदिवस हटके पद्धतीने साजरा करण्यासाठी एका तरूणाने पत्नीसह चक्क तलवारीने केक कापला. दरम्यान, तलवारीने केक कापतानाचा हा व्हिडिओ निदर्शनास येताच स्थानिक पोलिसांनी सदर तरुणाचा शोध घेऊन त्याला बेड्या ठोकल्या आहेत. ही घटना औरंगाबाद शहरातील पुंडलिकनगर पोलीस ठाण्याच्या (Pundlik Nagar Police) हद्दीत घडली आहे. याघटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे. याप्रकरणी स्थानिक पोलीस अधिक चौकशू करत आहेत.
दीपक सरकटे (वय, 23) असे संबधित तरूणाचे नाव आहे. दीपक हा विश्रांतीनगर भागातील गल्ली नंबर 2 मध्ये राहत आहे. दिपकचा काल (1 मे 2020) लग्नाचा वाढ दिवस होता. त्याने लग्नाच्या वाढदिवशी बायकोसमोर फुशारकी मारण्यासाठी चक्क तलवारीने केक कापला. या वाढदिवसाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर स्थानिक पोलिसांनी दिपक सरकटेला ताब्यात घेतला. त्याच्याकडे विचारणा केली असता लग्नाचा वाढदिवस साजरा करत असताना तलवारीने केक कापल्याची कबुली त्याने दिली आहे. हे देखील वाचा- Lockdown in Satara: सातारा जिल्ह्यात 10 मे पर्यंत कडकडीत लॉकडाऊन; अत्यावश्यक दुकानांना फक्त घरपोच सेवेसाठी परवानगी
तलवारीने केक कापण्याची ही पहिली वेळ नसून याआधीही असे अनेक व्हिडिओ समोर आले आहेत. पुण्यातील गणेश पेठ परिसरात गेल्या तीन महिन्यांपूर्वी सार्वजनिक ठिकाणी तलवारीने केक कापल्याची घटना उघडकीस आली होती. याप्रकरणी पुणे पोलिसांनी समीर ढमाले (वय, 27) या नावाच्या व्यक्तीला अटक केली होती.