Journalist Takes Funny Interview Of Donkey (Photo Credits: @arunbothra Twitter)

जगावर ओढावलेल्या कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटामुळे बाहेर मोकळेपणाने फिरण्यावर बंधने आली आहेत. कोविड-19 (Covid-19) चा संसर्ग टाळण्यासाठी घराबाहेर पडताना मास्क घालणे, सोशल डिस्टसिंग पाळणे बंधनकारक करण्यात आले आहे. परंतु, अनेकदा काहीजण या नियमांचे पालन न करता रस्त्यावर फिरताना दिसतात. दरम्यान मास्क आणि सोशल डिस्टसिंगचे महत्त्व पटवून देण्यासाठी आतापर्यंत विविध माध्यमातून जनजागृती करण्यात आली आहे. परंतु, तरी देखील अनेकदा नागरिकांकडून नियमांचे उल्लंघन होताना दिसते. नागरिकांच्या या बेफीकरीला टोला लगावणारा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या व्हिडिओत एक पत्रकार रस्त्यावर मास्क न घालता फिरणाऱ्या नागरिकांची मुलाखत घेत आहे आणि त्यांची तुलना थेट गाढवाशी करत आहे. पत्रकार या व्हिडिओ एका गाढवाची मुलाखत घेत त्याला विचारत आहे की, "कोविड-19 च्या संकटात तु मास्क का घातला नाहीस? यावर गाढव काय प्रतिक्रीया देणार?" त्यानंतर रस्त्यावरुन मास्क न घालता चालणाऱ्या नागरिकांना हा रिपोटर प्रश्न विचारतो की, "हा गाढव मास्क का घालत नाही. त्यावर नागरिक म्हणतो, तो गाढव आहे तो काय बोलणार नाही. त्यावर रिपोर्टर असं म्हणतो की, याचा अर्थ कोरोना व्हायरसच्या संकटात गाढवं रस्त्यावर मास्क न घालता फिरतात." हा व्हिडिओ IPS ऑफिसर अरुण ब्रोथा यांनी 'Best media interview of the Lockdown Period' असं म्हणत ट्विटरवर शेअर केला आहे.

पहा व्हिडिओ:

पत्रकार देत असलेला मेसेज, तुलना सुजाण नागरिकांच्या नक्कीच लक्षात आली असेल. त्यामुळे बेफीकरीने वागणाऱ्या लोकांसाठी हा व्हिडिओ डोळ्यात अंजन घालणारा आहे. तसंच यातून मास्क घालण्याचे महत्त्व अधोरेखित केले जात आहे.