Maharashtra Assembly Election 2019: राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेसमधील प्रमुख नेत्यांचे भाजपमध्ये दे दणादण पक्षप्रवेश होत आहेत. इतके की भाजप पक्ष प्रवेश आता सोशल मीडियावर टिंगलीचा विषय ठरु लागला आहे. सोशल मीडियावर भाजपच्या या मेगा भरतीची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. या पक्ष प्रवेशावर सोशल मीडियात विनोदांचा तर महापूरच आला आहे. शिवाय भाजपमधील या पक्षप्रवेशाची खिल्ली उडवणारे बॅनरही आता पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि विदर्भातील काही शहरांत झळकू लागले आहेत. भाजपचा हा पक्षविस्तार आता जनतेच्या पचनी पडणार की, या पक्षविस्ताराचे भाजपलाच अजिर्ण होणार याबाबत उत्सुकता आहे.
प्राप्त माहितीनुसार, भाजपमध्ये केल्या जाणाऱ्या पक्ष प्रवेशाबाबत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वेंगुर्ले तालुक्यात असलेल्या शिरोडा बाजारपेठ नाक्यावर भाजपची खिल्ली उडवणारे बॅनर झळकत आहे. तसेच, दक्षिण नागपुरातील काही भागातही 'भाजपा प्रवेश देणे आहे' असे लिहिलेले बॅनर झळखत आहे. (हेही वाचा, आम्ही फक्त सतरंज्याच अंथरायच्या का? काँग्रेस, राष्ट्रवादी पक्षातील आयारामांची वाढती संख्या पाहून, भाजप शिवसेना पक्षनिष्ठांमध्ये अस्वस्थता)
'त्या' बॅनरवर झळकणारा मजकूर, जसाच्या तसा
भाजपा प्रवेश देणे आहे
नियम व अटी
ईडी व आयकर विभागाची नोटीस आली असल्यास प्राधान्य
भ्रष्टाचाराचा अनुभव असल्यास पहिली पसंती
सहकार क्षेत्र बुडविल्याचा अनुभव हवा
टीप: विचारधारेची कोणतेही अट नाही. तसेच आमच्याकडे जागा नसल्यास मित्र शाखेत अॅडजेस्ट करता येईल.
प्रवेशासाठी त्वरीत संपर्क साधा. टोल फ्री नंबर 8980808080
दरम्यान, सोशल मीडियावर भाजपमध्ये होणाऱ्या पक्ष प्रवेशाचीही खिल्ली उडवण्यात आली आहे. यात गेले दोन तीन दिवस सूर्य दिसेना, भाजपमध्ये गेला वाटतं?, आधी कोणतेही बटन दाबलं तरी मत भाजपाला जात होतं. आता कोणालाही निवडून दिले तरी त्यो आमदार भाजपमध्ये जातोय. #कायकरावंबरं , अशा स्वरुपांच्या काही विनोदांचा यात समावे आहे.
राष्ट्रवादीच्या नेत्यांनी केला भाजपमध्ये प्रवेश
दरम्यान, राज्यातील विविध शहरांमध्ये भाजपची खिल्ली उडवणारी झळकत असलेली बॅनरबाजी आणि सोश मीडियावर व्हायरल झालेले जोक. उडवली जाणारी खिल्ली, टीका ही भाजपच्या कट्टर कार्यकर्त्यांनी या नव्या पक्षप्रवेशांना कंटाळून सुरु सुरु केली आहे की, यामागे विरोधकांचा हात आहे, हे मात्र अद्याप पुढे आले नाही.