Railway Track (PC - Wikimedia Commons)

West Singhbhum Train Children Viral Video: धावत्या मालगाडीच्या डब्याखाली असलेल्या लोखंडी पट्टीवर बसून काही लहान मुले प्रवास करत असतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ज्यामुळे यामुलांच्या आणि रेल्वेच्याही सुरक्षीततेबाबत अनेक प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. लेटेस्टली मराठी या व्हिडिओची पुष्टी करत नाही. हा व्हिडिओ झारखंड (Jharkhand) राज्याच्या पश्चिम सिंगभूम जिल्ह्यातील असल्याचे सांगितले जात आहे.

सांगितले जात आहे की, गाडी उभी राहिलेली तेव्हा तिथे काही मुले खेळत होती. मालगाडीच्या डब्याखालच्या मोकळ्या जागेत ही मुले गेली आणि तिथे खेळू लागली. दरम्यान, गाडीच्या नेहमीच्या तपासणीसाठी गाडी सुरु झाली. इतक्यात ही मुले तिथे अडकल्याचे एका मजुराने पाहिले आणि ही घटना उघडकीस आली. (हेही वाचा, Delhi Metro Viral Video: बसण्याच्या जागेवरून पुन्हा महिलांमध्ये जुंपली; भांडणाचा व्हीडिओ वायरल (Watch Video))

व्हिडिओ

रेल्वेखाली अडकलेल्या या मुलांची माहिती मजूराने तातडीने वरिष्ठांना दिली आणि या घटनेचा व्हिडिओही चित्रीत केला. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन जिल्ह्यातील सारंडा भागातील मुलांना आणि रहिवाशांना अशा धोकादायक गोष्टींपासून मुलांना रोखण्याचे अवाहन केले आहे.