Jawed Habib Viral Video: जावेद हबीब यांनी थूंकीचा वापर करुन महिलेचे कापले केस, पीडितेने केला 'हा' खुलासा
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits-Facebook)

Jawed Habib Viral Video:  उत्तर प्रदेशातील बागपत येथे राहणाऱ्या ब्युटी पार्लरची संचालिका हिने भारतातील टॉप हेअर स्टाइलिस्ट जावेद हबीब यांनी तिच्या डोक्यावर थुंकल्याचा आरोप लावला आहे. खरंतर प्रकरण असे आहे की, जावेद हबीब यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियात तुफान व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते एका महिलेच्या डोक्यात थूंकताना दिसून येत आहे. ऐवढेच नव्हे तर पुढे हबीब असे म्हणतात की, थुंकीत जीव आहे. यावरुनच महिलेने आरोप केला आहे की, जावेद हबीब यांनी थुंकीचा वापर करुन तिचे केस कापले.

सोशल मीडियात व्हायरल झालेल्या व्हिडिओत जावेद हबीब हे एका कार्यक्रमादरम्यान एका महिलेचे केस कापण्यासाठी तिच्या डोक्यात थुंकताना दिसून येतात. व्हिडिओत केस कापण्यासाठी पाण्याऐवजी ते थुंकीचा वापर करतात. हा सर्व प्रकार पाहून कार्यक्रमाला उपस्थितीत असलेल्या मंडळींना सुद्धा हे विचित्र वाटते. या व्हिडिओनंतर महिलेने तिला हबीब यांच्या वागणूकीमुळे काय वाटले याबद्दल सांगितले आहे.(Viral: लग्नासाठी तरुणाने संपूर्ण शहरात होर्डिंग्स लावत लिहिली 'अशी' गोष्ट, लोक ही वाचून चक्रावले)

Tweet:

जावेद हबीब यांच्यावर आरोप लावणाऱ्या महिलेचे नाव पुजा गुप्ता आहे. तिने असे म्हटले की, माझे वंशिका ब्युटी पार्लर नावाचे एक पार्लर आहे. तर मी जावेद हबीब यांच्या एका सेमीनारसाठी गेली होती. तेव्हा त्यांनी मला हेअरकट करण्यासाठी स्टेजवर बोलावले. त्याचवेळी त्यांनी माझे केस कापताना पाण्याऐवजी थुंकीचा वापर केला. त्यामुळे मी हेअरकट करुन घेतला नाही. त्यांच्या या वर्तवणूकीमुळे महिला भडकली आणि गल्लीतील एका सलूनमध्ये केस कापून घेईन पण हबीब यांच्याकडून नाही असे तिने म्हटले.

Tweet:

खरंतर हा व्हिडिओ 3 जानेवारीचा आहे. जावेद हबीब यांचा हा कार्यक्रम मुजफ्फरनगर येथे झाला होता. व्हिडिओमध्ये हबीब एका महिलेला केस कापण्यासाठी स्टेजवर बोलवतात.  त्यावेळी काही गोष्टींबद्दल बोलतात आणि केस कापण्यापूर्वी तिच्या डोक्यात थुंकतात. या प्रकरणी अद्याप कोणताही लेखी तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.