असं एक शहर जिथे मुलं जन्माला घातल्यास सरकारकडून मिळते 2.5 रुपयांचे बक्षिस
प्रतिकात्मक फोटो (Photo Credits: Unsplash)

काही देशात वाढत्या लोकसंख्येमुळे 'हम दो, हमारे दो' असा नारा लागावला जात असल्याचे आपण पाहतो. तर आता 'हम दो, हमारा एक' असा नवीन पद्धतीचा नारा उदयास आला आहे. परंतु ज्या देशात लोकसंख्या कमी आहे त्यांचे काय? जपान(Japan) मध्ये एक नागी नावाचे शहर आहे, तेथील लोकसंख्या वाढवण्यासाठी सरकाराने आगळेवेगळे पाऊल उचलले आहे. सरकारने या शहरातील दांपत्यांना मुल जन्माला घातल्यास बक्षिस स्वरुपात लाखो रुपये भेट म्हणून देत आहे. तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येक मुल जन्मल्यानंतरच्या मुलावेळी बक्षिसांची किंमत ही वाढविली जाते. म्हणजेच पहिलं मुलं जन्माला घातल्यास 60 हजार रुपये आणि 5 वे मुलं जन्माला घातल्यास 2.5 लाख रुपयांचे बक्षिस सरकारकडून दिले जाते.

सरकार असे का करत आहे?

जपानमध्ये तरुण आणि मुलांची संख्या कमी होत आहे. तर येथील वृद्धमाणासांच्या संख्येत दिवसेंदिवस जास्त वाढत चालली आहे. तर नवजात मुलांची संख्या दिवसागणिक कमी होत आहे. त्यामुळे ही समस्या दूर करण्यासाठी जपानच्या सरकारने एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. सरकारने शहरातील नागरिकांच्या बालकांना जन्म दिल्यानंतर विविध प्रकारच्या सोईसुविधा देऊ करतात.

फक्त 6 हजार लोकसंख्या

रिपोर्टनुसार. दक्षिण जपान मधील नागी शहराची लोकसंख्या फक्त 6 हजार एवढी आहे. तसेच नागी हा देश कृषीप्रधान म्हणून समजला जातो. या शहरातील प्रमुख कारण पैशांचा अभाव आणि जीवन यांची कमरता फार मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते. त्यामुळेच 2004 पासून सरकारने या देशातील दांपत्यांनी मुल जन्माला घातल्यास पैसे देण्याचा निर्णय घेतला आहे.

एकत्र कुटुंब पद्धतीस प्रथम प्राधान्य

या शहरातील नागरिकांना एकत्र कुटुंब पद्धतीमध्ये राहण्यास त्यांना आवडते.तसेच 30 वर्षाच्या खाली लग्न झाले तरीही या परिवारातील तरुण मंडळींना त्यांच्या घरातील मंडळींसोबत राहणे योग्य वाटते. तसेच घरात वयोवृद्ध व्यक्ती असल्यास घरातील लहान मुलांकडे लक्ष देण्याचा वेळ ही वाचतो.