नववर्ष दिन Google Doodle: गूगल ने दिल्या 2021 नववर्षाच्या पहिल्या दिवशी खास अ‍ॅनिमेटेड डूडल द्वारा शुभेच्छा!
January 1 New Year's Day Google Doodle (Photo Credits: Google)

January 1 New Year's Day Google Doodle:  अखेर 2020 ला अलविदा म्हणून आपल्या सार्‍यांचा नवं वर्ष 2021 मध्ये प्रवेश झाला आहे. ग्रेग्रेरियन कॅलेंडरचा आज पहिला दिवस म्हणजे 1 जानेवारी अर्थात नववर्ष दिन (January 1 New Year's Day). अनेकांसाठी चढ-उतारांचे, कडू- गोड आठवणींचे ठरलेले हे 2020 वर्ष मधून धडे घेऊन आता नव्या उमेदीने पुन्हा सारे जण उभे राहिले आहेत. गूगल (Google) या जगातील अग्रगण्य सर्च इंजिनवर देखील हीच सकारात्मकता पहायला मिळाली आहे. गूगलने देखील खास नववर्षदिन 2021 च्या रंजक गूगल डूडल (Google Doodle) मधून सार्‍यांनाच या नव्या वर्षाच्या पहिल्या दिवसाची जाणीव करून दिली आहे. Happy New Year 2021 Quotes: नववर्ष दिन सकारात्मकतेने सुरू करण्यासाठी मराठमोळे संदेश,WhstaApp Status आणि मेसेजेस!

जगाच्या विविध भागांमध्ये टाईम झोन नुसार वेगवेगळ्या वेळी नवं वर्षाची सुरूवात झाली. यामध्ये न्यूझिलंड आणि ऑस्ट्रेलिया सारख्या देशात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. त्यानंतर जसजसा इतर भागात सूर्य अस्ताला गेला तसे नागरिकांनी जल्लोषात नववर्षाचे स्वागत केले. दरम्यान यंदा न्यू ईयर सेलिब्रेशनवरही कोरोना वायरसचे संकट पहायला मिळाले. याच पार्श्वभूमीवर अनेक ठिकाणी जंगी सेलिब्रेशन रद्द करण्यात आले होते. New Year 2021 Wishes In Marathi: नवीन वर्षाच्या शुभेच्छा मराठी संदेश, Messages WhatsApp, Facebook द्वारा शेअर करून खास करा नववर्षाचा पहिला दिवस.

2020 हे वर्ष चांगलं नक्कीच नव्हतं पण हे वर्ष प्रत्येकासाठी कायम स्मरणात राहील असं होतं. अनेकांच्या त्यांच्या आयुष्यात कायम पुढच्या पिढीला सांगावी अशी एक खास आठवण असते असे म्हणतात. आपल्या अनेकांकडे ही 2020 बद्द्ल असेल. मागील 8-9 महिन्यांपेक्षा जास्तीचा काळ लॉकडाऊन आणि अनलॉकच्या प्रक्रियेमध्ये गेल्यानंतर त्या सार्‍यातून पुन्हा नव्या उमेदीने उभं राहण्यासाठी आपल्याकडे नक्कीच काही बळ, आशा-अपेक्षा असतील. त्या सार्‍यांना घेऊन आज आपल्या सार्‍यांकडेच पुन्हा काहीतरी नवं सुरू करण्याची संधी आहे. त्यामुळे या नव्या वर्षाच्या नववर्षदिनी तुम्हांला खूप सार्‍या शुभेच्छा! हॅप्पी न्यू ईयर.