जालंधर (Jalandhar) येथील पंधरा वर्षाच्या मुलीने तिचा मोबाईल हिसकावून घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या दुचाकीवाल्याला चांगलाच धडा शिकवला. जालंधर-कपूरथला रोड जवळील दीन दयाल उपाध्याय नगर येथे दुपारी अडीचच्या सुमारास ही घटना घडली. दुचाकीवरील चोराने या मुलाचा मोबाईल हिसकावून घेण्यासाठी तिच्यावर धारदार शस्त्राने हल्ला केला. मात्र तरी मुलीने आपला फोन परत काढून घेतला. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीमध्ये कैद झाली असून, या मुलीचे धैर्य सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय झाला आहे. कुसुम कुमारी या मुलीने शौर्य दाखवित फक्त आपला फोनच वाचवला नाही, तर तिने या चोराला अटकही करवले.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे की, कुसुम एकटीच रस्त्याने जात होती, तेवढ्यात मागून एका दुचाकीवरून दोन लोक आले. दुचाकीवरून त्यांनी या चालणार्या कुसुमच्या हातातून फोन हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. मुलीने या गोष्टीचा विरोध केला व ती दुचाकीच्या मागे पळाली. दरम्यान, तेथून पळ काढण्याच्या प्रयत्नात असताना दुचाकीस्वाराने मुलीच्या मनगटावर धारदार शस्त्राने वार केले. पण जखमी होऊनही कुसुमने तरुणाला सोडले नाही. उलट त्याला गाडीवरून खाली पाडून आपला फोन परत मिळवण्यासाठी तीने झटापट सुरु केली. (हेही वाचा: Daughter Spots Father's Ghost: मुलीला दिसला आपल्या वडिलांंचा आत्मा? कॅमेर्यात कैद झालेला हा अमानवी प्रकार पाहा)
पहा व्हिडीओ -
#WATCH पंजाब, जालंधर : (30.08) दो बाइक सवारों ने एक लड़की कुसुम (15 साल) का फोन छीनकर भागने के दौरान उस पर किसी तेज हथियार से हमला किया। घटना CCTV में कैद।
(31.08.2020) SHO ने कहा, "एक अपराधी गिरफ्तार और दूसरे की तलाश जारी है। लड़की के हाथ का इलाज अस्पताल में किया जा रहा है" pic.twitter.com/yr2FdmmEXi
— ANI_HindiNews (@AHindinews) September 1, 2020
दरम्यान, कुसुमचा आरडाओरडा एकून काही लोक जमा झाले व त्यांनी या तरुणाला पकडून पोलिसांकडे दिले. अविनाश कुमार असे याचे नाव असून तो 22 वर्षांचा आहे. कुसुम शिकवणीला जात असताना ही घटना घडली. सध्या शिक्षणासाठी फोन अतिशय महत्वाचा असल्याने, कुसुमने यासाठी अगदी चोरांशी मारामारी केली. अविनाशसोबतचा जो साथीदार होता तो पळून जाण्यात यशस्वी झाला. आरोपींवर भादंवि कलम 389 बी आणि 307 (खुनाचा प्रयत्न) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.