Daughter Spots Father's Ghost: मुलीला दिसला आपल्या वडिलांंचा आत्मा? कॅमेर्यात कैद झालेला हा अमानवी प्रकार पाहा (Watch Video)
टेक्सास (Texas) मधील एका महिलेने अलिकडेच आपल्या मृत वडिलांंच्या आत्म्याने आपल्याशी संंवाद साधल्याचा दावा केला आहे. हा दावा नुसता शाब्दिक नसुन तिने यासोबत एक विचित्र व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे.
Daughter Spots 'Father's Ghost: टेक्सास (Texas) मधील एका महिलेने अलिकडेच आपल्या मृत वडिलांंच्या आत्म्याने आपल्याशी संंवाद साधल्याचा दावा केला आहे. हा दावा नुसता शाब्दिक नसुन तिने यासोबत एक विचित्र व्हिडिओ सुद्धा शेअर केला आहे. आता हा व्हिडिओ किती खरा आहे याबाबत आम्हाला शंका असली तरी, या मध्ये दिसणारा अमानवी प्रकार निश्चितच लक्ष वेधुन घेत आहे. या तरुणीचे नाव नोर्मा असे असुन साधारण दहा वर्षांंपुर्वी तिच्या वडिलांंचे निधन झाले होते तर आता तिची आई सुद्धा कॅन्सर शी झुंंज देत आहे. नोर्माच्या माहितीनुसार एकदा ती आपल्या आईशी बोलत बसली असता मध्येच उठुन तिला दुसर्या खोलीत जावेसे वाटले याच वेळी घराच्या बाहेरील सिक्युरिटी कॅमेर्यात तिला काहीशी हालचाल दिसली, पांंढर्या रंंगाची एक आकृती तिला बाल्कनी मधील खिडकीत बसलेली दिसली म्हणुन ती घराबाहेर गेली असता तिला त्या खुर्चीत आपल्या वडिलांचा आत्मा दिसल्याचे तिचे म्हणणे आहे.
तुम्ही आम्ही असा विषय ऐकुन नक्कीच याला अंंधश्रद्धा किंंवा भास समजुन अधिक चर्चा करणार नाही पण नोर्मा ने आपल्या दाव्याचा पुरावा देत प्रसिद्ध केलेल्या व्हिडिओ मध्ये खरोखरच अशा हालचाली दिसुन येत आहेत हा प्रकार पाहण्यासाठी खाली दिलेला हा व्हिडिओ नक्की पाहा. Ghost at Park: दिल्लीच्या Japanese Park मध्ये रात्री अचानक भुताने केला व्यायाम? जाणून घ्या नक्की काय आहे ‘या’ झांशीच्या व्हायरल व्हिडिओचे प्रकरण (Watch Video)
पहा व्हिडिओ
आता रिपोर्टनुसार एक बाब आपण लक्षात घेऊ शकतो की नोर्माने म्हंटलेय की, जेव्हा मी माझ्या आईशी बोलत होते तेव्हा वडिलांंची सतत खुप आठवण येत होती कदाचित यामुळेच तिला असा आभास झालेला असुन शकतो. ही खुर्ची नोर्माच्या वडिलांंची आवडती जागा होती आणि तिथेच तिला ते दिसुन आले असे तिने सांंगितले आहे.
नोर्माने याबाबत द सन ला दिलेल्या मुलाखतीत आपण घाबरलो नाही कारण माझे वडील हे माझ्यासाठी आले होते त्यामुळे उलट त्यांंना बघुन मला शांंत वाटत आहे असे सुद्धा म्हंंटले आहे.
(The above story first appeared on LatestLY on Aug 30, 2020 11:49 PM IST. For more news and updates on politics, world, sports, entertainment and lifestyle, log on to our website latestly.com).

