उत्तर प्रदेश: आकाशात उडणाऱ्या Iron Man च्या आकाराचा फुग्याने दनकौर गावातील नागरिकांमध्ये खळबळ
Iron Man Balloon Triggers Panic In UP Town (Photo Credits: Twitter)

उत्तर प्रदेश (Uttar Pradesh) मधील नोएडा (Noida) मध्ये लोकप्रिय कार्टून सुपरहिरो (Fictional  Superhero) आयर्न मॅन (Iron Man) च्या आकाराचा फुगा आकाशात दिसल्याने नागरिकांमध्ये एकच खळबळ उडाली. हा फुगा पाहून एखादा एलियन (Alien) आकाशात असल्याचे नागरिकांना वाटले आणि त्यावरुन एकच गोंधळ निर्माण झाला. गॅसने भरलेला हा फुगा आयर्न मॅनच्या आकारामुळे एखाद्या रोबोटसारखा दिसत होता. ही घटना शनिवारी (17 ऑक्टोबर) सकाळी घडली. (Little Girl Swims With Python: पाळलेल्या अजगरासोबत 8 वर्षांच्या मुलीचे स्विमिंग; थक्क करणारा 'हा' व्हायरल व्हिडिओ नक्की पहा)

काही वेळाने हा फुगा भट्टा परसौल गावाजवळील तलावामध्ये पडला, अशी माहिता अधिकाऱ्यांनी दिली आहे. गॅसने भरलेला हा फुगा आकाशमध्ये खूप वेळ उडत होता आणि काही वेळाने तलावाजवळील झुडूपांमध्ये अडकला. या फुग्याचा हा पाण्याला स्पर्श करत होता त्यामुळे फुग्याची हालचाल होताना दिसत होती. अशी माहिती दनकौरचे पोलिस अधिकारी अनिल कुमार पांडे यांन दिली. (ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ)

या फुग्याच्या निराळ्या आकारामुळे लोकांमध्ये खूप गोंधळ उडाला होता आणि भीती निर्माण झाली होती. हा फुगा आयर्न मॅन या फ्रिक्शनल सुपरहिरो सारखा होता. गावातील लोकांनी असे दृश्यं पहिल्यांदाच पाहिले होते. त्यामुळे एलियन किंवा इतर काही असल्याच्या भीतीने गावकऱ्यांमध्ये गोंधळ उडाला, असे गावकऱ्यांनी सांगितले. फुग्यामधील गॅस संपल्यानंतर तो खाली येऊन झुडुपांमध्ये अडकला. हा फुगा हानिकारक नव्हता. परंतु, हा फुगा हवेत नेमका कोणी सोडला याचा पोलिस तपास करत आहेत.

यापूर्वी यांसारख्या काही मजेशीर पण संशयास्पद घटना समोर आल्या आहेत. साधारण वर्षभरातपूर्वी नवी मुंबईतील एका इमारतीवर पॅराशूटने महिला उतरल्याचे पाहून नागरिकांमध्ये भीती निर्माण झाली होती. त्यानंतर या महिलेने इमारतीच्या 24 व्या मजल्यावरून बेस जपिंग केल्याचे समोर आले होते.