Viral Video: ताडाच्या झाडावर बसून कापत होता झाडाचा शेंडा, नेटीकरी म्हणाले हे तर 'रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षाही भीतीदायक'; पहा काळजाचा ठोका चुकवणारा व्हिडिओ
Man cuts palm tree (फोटो क्रेडिट्स: ट्विटर )

Viral Video: सोशल मीडियावर दररोज नवनवीन व्हिडिओ व्हायरल होत असतात. सध्या सोशल मीडियावर असाचं एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुमच्या काळजाचा ठोका चुकवल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती ताडाच्या झाडावर (Palm Tree) बसून झाडाचा शेंडा कापताना दिसत आहे. (Man Cuts Palm Tree) काही वेळातचं ताडाच्या झाडाचा कापलेला शेंडा एक दिशेने खाली कोसळताना दिसत आहे. तसेच शिल्लक राहिलेल्या झाडावर ही व्यक्ती अडकून पडली आहे. या व्हिडिओमधील झाडं अतिशय उंच असल्याने कापताना ते एका बाजूला वाकले गेले होते. परंतु, झाड कापल्यानंतर त्याचा शेंडा एका बाजुला फेकला गेला आणि उर्वरित झाड वेगाने हेलकावे घेऊ लागलं. हे दृश्य पाहिल्यानंतर झाडावरील व्यक्ती आता खाली कोसळतो की, काय? असं वाटू लागतं. मात्र, ही व्यक्ती प्रसंगावधान राखत झाडाला घट्ट पकडून बसलेली दिसत आहे.

हा व्हिडिओ पाहताना नेटकरी भारावून गेले आहेत. यातील अनेकांनी या व्हिडिओवर प्रतिक्रिया दिल्या आहेत. यातील एका नेटीझन्सने म्हटलं आहे की, 'हे तर रिव्हर्स बंजी जंपिंगपेक्षादेखील भीतीदायक आहे.' (हेही वाचा - Python Swallows Nilgai Calf-Video: थरारक व्हिडिओ; अजगराने गिळले नील गाईचे वासरु)

दरम्यान, 34 सेंकदाचा हा व्हिडिओ अमेरिकी बास्केटबॉलर @RexChapman ने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. या व्हिडिओवर नेटीझन्स वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहेत. आतापर्यंत 67 लाखहून अधिक यूजर्संनी हा व्हिडिओ पाहिला असून हजारो नेटकऱ्यांनी यावर प्रतिक्रिया दिल्या आहे.