iPhone 12 Price Funny Memes: नव्या आयफोनच्या किंमती ऐकून अनेकांना भरली धडकी; किडनी विकण्यापासून ते iPhone 5च्या लूक सोबत बरोबरी करत अनेक मजेशीर मिम्स सोशल मीडियात व्हायरल!
iPhone 12 Price Funny Memes (Photo Credits: @Sutri05/ Twitter)

Apple च्या बहुप्रतिक्षित iPhone 12 Smartphones चा लॉन्चिंग सोहळा काल अमेरिकेमध्ये पार पडला आहे. अ‍ॅपलने iPhone 12 मध्ये चार नवे फोन जाहीर केले आहेत. यामध्ये iPhone 12 mini, iPhone 12, iPhone 12 Pro आणि iPhone 12 Pro Max यांचा समावेश आहे. अ‍ॅपल ही त्यांच्या दर्जेदार प्रोडक्ट्स साठी ओळखली जातात त्यामुळे त्यांच्या किंमती देखील तगड्या असतात. अ‍ॅपलच्या आयफोन 12 सीरीजमध्येiPhone 12 Pro, iPhone 12 Pro Max मध्ये आता 128GB, 256GB, 512GB हे व्हेरिएंट्स उपलब्ध आहेत आणि त्यांच्या किंमती 119,900 आणि 129,900, रूपये आहेत. लाखांच्या घरातले लॉन्च झालेले अ‍ॅपलचे नवे वे स्मार्टफोन पाहून त्यांच्यावरील मिम्स व्हायरल होण्यासाठी सुरूवात झाली आहे. सोशल मीडियामध्ये नव्या आयफोन 12 चे मिम्स आता धुमाकूळ घालत आहेत. त्यापैकी काही तुम्ही नक्की पाहून हसाल! iPhone 12 Effect: Apple कडून आयफोन ची नवी सीरीज लॉन्च होताच भारतामध्ये iPhone 11, iPhone XR, iPhone SE च्या किंमती घटल्या; इथे पहा नव्या किंमती

iPhone 12 मिम्स

आयफोनच्या किंमती हा चर्चेचा विषय असतो

अनेकांसाठी आयफोन विकत घेण्यासाठी पैसे गोळा करणं म्हणजे किडनी विकून पैसे उभे करण्यासारखं आहे.  प्रतिक्षा संपली! iPhone 12 सीरिज अखेर लाँच, किंमती प्रमाणे तितक्याच ताकदीची आहेत यांची ठळक वैशिष्ट्ये, वाचा सविस्तर

अनेकांनी लॉन्च झालेला आयफोन 12 हा classic iPhone 5 च्या लूक सारखा असल्याचं म्हटलं आहे.

काहींच्या मते iPhone 10, 11 आणि 12 सारखेच दिसतात.

अ‍ॅपलकडून काल लॉन्च करण्यात आलेली iPhone 12 आणि iPhone 12 Pro ची सीरीज भारतामध्येही उपलब्ध होत आहे. आयफोन प्रेमींना हा नवा फोन 30 ऑक्टोबरपासून खरेदीसाठी उपलब्ध असेल.