Bhupendra Jogi | Photo Credits: instagram)

Bhupendra Jogi Viral: व्हायरल इंस्टाग्राम रीलद्वारे प्रसिद्धी मिळविलेल्या भूपेंद्र जोगी (Bhupendra Jogi Attacked) यांच्यावर चाकूहल्ला झाला आहे. ही घटना मंगळवारी (8 मे) संध्याकाळी घडली. प्राप्त माहितीनुसार, दोन मुखवटाधारी हल्लेखोरांनी चाकूने हल्ला (Bhupendra Jogi Allegedly Attacked by Masked Assailants in Bhopal) केला. भोपाळच्या न्यू मार्केटमध्ये असलेल्या त्यांच्या तयार कपड्याच्या दुकानातून घरी परतत असताना जोगी हा व्यापारी हल्ल्याचा बळी ठरला. दरम्यान, त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत रात्री नऊच्या सुमारास अधिकृतरित्या माहिती पुढे आली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यू मार्केट परिसराला लागून असलेल्या रोशनपुरा येथील 'बापू की कुटिया' जवळ चेहरा झाकून आलेल्या दोन अज्ञात हल्लेखरांनी जोगी यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या पाठीवर आणि हातावर चाकूने खोल जखमा केल्या. या वेळी झालेल्या झटापटीत जोगी यांना 10 टाके पडल्याचे समजते.

भूपेंद्र जोगी गंभीर जखमी

प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, हल्लेखोरांनी भूपेंद्र जोगी यांच्यावर पाठीमागून वार केले. हल्लेखोरांनी आपला चेहरा कापडाने झाकून लपवला होता. त्यामुळे त्यांची ओळख पटवताआली नाही. दरम्यान, अचानक झालेल्या हल्ल्यातून स्वत:चा बचाव करत असताना जोगी यांना जबर मार लागला. त्यात ते गंभीर जखमी झाले. हल्लेखोरांनी त्यांच्यावर चाकूने वार केले. यातील काही वार त्यांच्या हातावर आणि पाठीवर झाले. ज्यामुळे त्यांच्या शरीरावर मोठ्या जखमा झाल्या. हल्ला झाल्याच्या घटनेनंतर जोगी यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. या वेळी वैद्यकीय उपचार करत असताना डॉक्टरांनी त्यांच्या जखमा भरण्यासाठी काही टाके घातले. (हेही वाचा, Dharashiv: धाराशिव येथे राजकीय वादातून मतदान केंद्राजवळ चाकू हल्ला, एकाचा मृत्यू)

नाम क्या है... भूपेंद्र जोगी, इंटरनेटवर प्रसिद्ध

भूपेंद्र जोगी हे व्हायरल इंटरनेट पर्सनालिटी आहेत. युट्युब आणि खास करुन इन्स्टाग्रामवर ते विशेष लोकप्रिय आहेत. "नाम क्या है... भूपेंद्र जोगी" रीलमुळे त्यांना जोरदार प्रसिद्धी लाभली. ज्यामुळे त्यांना अल्पावधीतच दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळाले आणि ते इंस्टाग्रामवर प्रसिद्ध झाले. इंटरनेटवर व्हायरल झाल्यावर सोशल मीडियावरील त्यांच्या चाहत्यांमध्ये वाढ झाली. पण, त्यांची प्रसिद्धी लोकप्रिय मीम्समध्येही बदलली. त्याच्या नवीन प्रसिद्धीमुळे त्यांची भेट माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याशी झाली. त्यामुळेही ते पुन्हा नव्याने चर्चेत आले. (हेही वाचा, Pune Shocker: किरकोळ कारणावरून वीस तरुणांच्या टोळक्याने दोन व्यक्तींवर केला हिंसक हल्ला; मोहम्मदवाडी परिसरातील धक्कादायक घटना (Watch Video))

व्हिडिओ

 

 
 
 

View this post on Instagram

 
 
 

 

A post shared by Bhupendra Jogi (@bhupendrajogi)

दरम्यान, जोगी यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत अधिक माहिती मिळू शकली नाही. कोणासोबतही वैयक्तीक शस्त्रूत्व अथवा वाद नसतानाही आपल्यावर मोठा हल्ला झाल्याचे भूपेंद्र जोगी यांनी म्हटले आहे. या प्रकरणात अरेरा हिल्स पोलीस स्टेशन दप्तर भारतीय दंड संहिता कलम 307 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हल्लेखोरांची ओळख पटली नाही. तसेच, या प्रकरणात आतापर्यंत कोणालाही अटक झाल्याचे वृत्त नाही. शिवाय ही घटना अत्यंत गजबजलेल्या परिसरात आणि लोकसभा निवडणूक अचारसंहितेच्या काळात घडली आहे. असे असले तरी विशेष म्हणजे ही घटना परिसरातील कोणत्याच सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली नाही. तसा व्हिडिओ अथवा फुटेज अद्यापपर्यंत तरी पुढे आले नाही.