Narayan Murthy Touches Ratan Tata’s Feet (Photo Credits: @TiEMumbai/ Twitter)

मुंबई (Mumbai) येथे शुक्रवारी पार पडलेल्या टायकॉन (TieCon) पुरस्कार वितरण सोहळ्यात इनफोसिसचे (Infosys) नारायण मूर्ती (Narayana Murthy) यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. या सोहळ्यात नारायण मूर्ती यांनी टाटा समुहाचे रतन टाटा (Ratan Tata) यांचे पदस्पर्श करून आशिवार्द घेतला आहे. भारताचे 2 दिग्गज उद्योगपती आणि त्यांचे साधे राहणीमान लोकांना भावलेली आहे. नारायण मूर्ती आणि रतन टाटा यांनी भारतीतील उद्योगपतींना मोठी प्रेरणा दिली आहे. सध्या रतन टाटा यांचे वय 82 वर्षे आहे तर, नारायण मूर्ती हे 72 वर्षाचे आहेत.

मुबंई येथे टायकॉन पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. या सोहळ्यात रतन टाटा यांना लाईफ टाईम अचिव्हमेंट सन्मानित करण्यात आले होते. दरम्यान, नारायण मूर्ती यांच्या हस्ते रतन टाटा यांना पुरस्कार देण्यात आला. त्यावेळी नारायण मूर्ती यांनी रतन टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर लगेचच खाली वाकत रतन टाटा यांचे पदस्पर्श केले. त्यावेळी त्याठिकामी उपस्थितीत असलेल्या लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. हे देखील वाचा- भंडारा: वाघाच्या तावडीतून सुटण्यासाठी तरुणाने घेतले मेल्याचे सोंग; पहा व्हायरल व्हिडिओ

ट्वीट-

महत्वाचे म्हणजे, माहिती आणि तंत्रज्ञान क्षेत्रात मूर्ती यांची इन्फोसिस आणि टाटा समूहातील 'टीसीएस' या दोन्ही कंपन्या एकमेकांच्या कट्टर प्रतिस्पर्धी आहेत. मात्र, टाटा यांचा अनुभव आणि त्यांचे ज्ञान नेहमीच इतर उद्योजकांसाठी मार्गदर्शक ठरले आहे. 82 वर्षीय रतन टाटा यांना कॉर्पोरेटमध्ये आदराचे स्थान आहे. त्यामुळेच टाटा यांना पुरस्कार दिल्यानंतर मूर्ती आपसूकच त्यांच्यासमोर झुकले आणि त्यांचे आशीर्वाद घेतले. टाटा यांनीही मूर्ती यांना तशाच प्रकारे प्रतिसाद दिला. ते म्हणाले की नारायण मूर्तीसारख्या एका श्रेष्ठ मित्राकडून हा पुरस्कार मिळेल हे माझे भाग्य समजतो, अशी भावना टाटा यांनी व्यक्त केली.