IND vs WI T20I: फ्लोरिडा येथील क्रिकेट स्टेडियममध्ये सामन्यादरम्यान 'पुष्पा' चित्रपटातील Samantha Ruth Prabhu  हिच्या  'Oo Antava' गाण्यावर चाहत्यांचा डान्स, व्हिडिओ व्हायरल
Samantha, Fans dancing to 'OO Antava' (Credit: Twitter)

'पुष्पा': द राइज' (Pushpa: The Rise) चित्रपटातील समंथा रुथ प्रभूच्या (Samantha Ruth Prabhu) 'ओ अंटावा' (Oo Antava) या गाण्याने चाहत्यांच्या हृदयावर चांगलाच प्रभाव गाजवला. हा चित्रपट आणि हे गाणेसुद्धा लॉन्च होऊन आता जवळपास आठ महिने झाले. तरीही या गाण्याची जादू अद्यापही कायम आहे. प्लोरीडा येथील एका स्टेडीयमवरही याचा प्रत्यय आला. IND vs WI T20I सामन्यादरम्यान चाहत्यांनी 'Oo Antava' गाण्यावर चांगलाच ठेका धरला. त्याचा व्हिडिओही सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

ओ आंटावा गाण्याचा एक ट्रॅक मैदानावर वाजविण्यात आला आणि तेवढे कारण पुरेसे ठरले. चाहत्यांनी चांगलाच ठेका धरला. चाहत्यांनी शेअर केलेल्या अलीकडील व्हिडिओ क्लिपमध्ये, फ्लोरिडा येथे भारत विरुद्ध वेस्ट इंडिज पाचव्या T20I सामन्यातील उपस्थितांना आपण तेलुगु ट्रॅकवर नाचताना पाहू शकतो. हे गाणे लॉन्च होताच जगभरात अनेक विक्रम मोडले गेले आणि द फॅमिली मॅनच्या राजीला अशा हॉट सेन्सुअल अवतारात पाहून प्रत्येकजण थक्क झाला. या गाण्याचा उत्साह अद्यापही कायम आहे. जसा सुरुवातीपासून आहे. (हेही वाचा, Amruta Khanvilkar Dance Video Viral: Amruta Khanvilkar ने 'Oo Antava' या गाण्यावर केला अतिशय Sexy डान्स, व्हिडिओ व्हायरल)

ट्विट

Ormax ने अलिकडेच केलेल्या अहवालानुसार समंथा हिने भारतातील भारतभरातील सर्वाधिक लोकप्रिय महिला अभिनेत्रीपैकी पहिल्या तीनमध्ये क्रमांक पटकावला आहे. तिने हे देखील सिद्ध केले आहे की तिच्याकडे केवळ एक गूढ आकर्षणच नाही तर देशभरात अतुलनीय फॅन्डम देखील आहे. ही अभिनेत्री आगामी काळातही आनेक चित्रपटांमध्ये पाहायला मिळणार आहे.