संजय राऊत पेटीवादन (Photo Credit : Facebook)

सध्या देशावर कोरोना व्हायरसचे संकट चालून आले आहे. या संकटाशी दोन हात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉक डाऊन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीमध्ये सामान्य जनतेपासून, सेलेब्ज, राजकारणी लोक जास्तीत जास्त वेळ घरातच व्यतीत करत आहेत. यामुळेच राजकीय पटावर शब्दांचे फटकारे मारणाऱ्या संजय राऊत यांचे एक आगळेवेगळे रूप पाहायला मिळाले. काल संजय राऊत यांची बोटे चक्क पेटीवर थिरकताना दिसून आली. संजय राऊत यांची मुलगी पुर्वशी राऊत हिने याचा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे.

संजय राऊत पेटीवादन -

आपल्या पोस्टमध्ये पुर्वशी लिहिते, ‘सामना'चा संपादक म्हणून, शिवसेना नेता म्हणून तो फक्त फटकारे मारतो असा एक गैरसमज आहे. तो रूक्ष असावा असे अनेकदा अनेकांनी म्हटले आहे. पण तो तसा नाही. तो राजकारणापलीकडे वाचतो, ऐकतो आणि बोलतो. तो आजही सैगल, बेगम अख्तर, चंद्रू आत्मा ऐकतो.. ऐकताना गुणगुणतो....ते गुणगुणणे मनापासून असते. तो मूडमध्ये असला की त्याची बोटे टेबलावर तालात थिरकतात. आज खुप वर्षांनी तो सक्तीने घरी होता. त्याचे रेग्युलर वाचन आणि लिखाण आटोपल्यावर त्याने त्याची लाडकी पेटी बाहेर काढली..ती स्वतः साफ केली... आणि आजची आमची संध्याकाळ संगीतमय करून टाकली.’ (हेही वाचा: Coronavirus: मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे सोशल मीडियावर सुपर हिट; निर्णयक्षमता, प्रशासनावरील पकड यावर होतीय चर्चा)

महाविकास आघाडी सत्तेत येण्याआधीचा काळ हा शिवसेनेसाठी फार आव्हानात्मक होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांच्यासोबत संजय राऊत यांनीच शिवसेनेची धुरा आपल्या खांद्यावर समर्थपणे पेलली. सामना, असो वा सोशल मिडिया त्याकाळात राऊत यांच्या शब्दांचे फटकारे विरोधी पक्षातील अनेक नेत्यांना बोचले होते. अशावेळी एक रुक्ष माणूस अशीच त्यांची ओळख रूढ झाली होती. मात्र आताच्या या व्हिडिओने हा समाज पुसून टाकला आहे.