प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

महिलांना घरातील कामांचा व्याप जास्तच असतो. त्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत की त्या करताना काही महिला कंटाळा करतात. त्यामध्ये भाजी साफ करणे, खोबरे खिसणे किंवा लसूण सोलणे अशा विविध पद्धतीचे काम जरा वेळखाऊ असते. मात्र सध्या सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळे त्यावर येणारे विविध व्हिडिओ अशा गोष्टी कशा सोप्या पद्धतीने कराव्यात याबद्दल सांगतात.

सध्या सोशल मीडियात लसूण सोलण्याची सोपी पद्धत काय आहे याबद्दल एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. त्यामुळे महिलांना लसूण सोलण्यासाठी फार कष्ट घ्यावे लागणार नसून अगदी काही मिनिटांतच लसूण सोलून होणार आहे. तर पाहूयात कशा पद्धतीने लसूण अगदी सहजरित्या साफ करता येते.(उकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी)

यापूर्वी सुद्धा भाजी किंवा कोथिंबीर साफ करण्यासाठी सोपी पद्धत कोणती त्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. त्यावेळी सुद्धा अनेक गृहिणींनी त्या सोप्या पद्धतीचा वापर करत अगदी काही वेळातच भाजी किंवा कोथिंबर साफ करुन होत असल्याचे व्हिडिओ सोशल मीडियात पोस्ट केले होते.