उकाड्यापासून नवऱ्याला थंडावा मिळावा म्हणून बायकोने 'नवरत्न तेल' मध्ये तळली भजी
प्रतिकात्मक फोटो (फोटो सौजन्य-फेसबुक)

नवी दिल्ली  एका विवाहित महिलेने नवऱ्याला उकाडा जाणवत होता. त्यामुळे तिने नवऱ्याला उकाड्यापासून थंडावा मिळावा म्हणून चक्क नवरत्न तेलामध्ये भजी तळल्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियात प्रचंड व्हायरल होत आहे. तर टिकटॉकवरील या व्हिडिओला नेटकऱ्यांचा भरपूर प्रतिसाद मिळाला असून कोणालाही हसू आवरता येत नाही आहे अशी स्थिती निर्माण झाली आाहे.

सध्या राज्यात पावसाच्या सरी तितक्याश्या जाणवत नसून ऐन दुपारच्या वेळेस उकाडाच जाणवतो. त्यामुळे उन्हाळ्यात तहान भागवण्यासाठी पाणी जास्त प्रमाणात पिताना दिसून येतात. मात्र टिकटॉकवर चक्क बायकोने नवरत्न तेलात नवऱ्यासाठी भजी तळ्याचा व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

(Tik Tok: घरबसल्या यूजर्सला मिळणार 1 लाख रुपये कमविण्याची सुवर्णसंधी)

खरंतर नवरत्न तेल हे डोक्याला शांतता मिळावी म्हणून वापरले जाते. मात्र टिकटॉक वरील व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे लोक काहीही करु शकतात हे आता पाहायला मिळले आहे.तर सध्या टिक टॉक अॅप हे देशातील बहुतांश नागरिकांनी डाऊनलोड केले असून त्याचे युजर्सची संख्या लाखोच्या घरात जाऊन पोहचली आहे.