UK Royal Palace मध्ये Housekeeper ची नोकरी; 18.5 लाख पगारासह राहण्याची आणि जेवणाची सोय,पहा कसा कराल अर्ज 
Housekeeping at Royal House (Photo Credits: Twitter, Pixabay)

एक ब्रिटीश रॉयल फॅमिली एक सक्षम आणि कुशल घरकामगाराच्या शोधात आहे. त्याला मिळणारा असणारा पगार जर तुम्ही ऐकाल तर थक्क व्हाल. खुप शिकून चांगल्या डॉक्टर आणि इंजिनीअर ला पण एवढा पगार मिळत नसेल तेवढा या रॉयल घरात काम करण्याच्या हाउसकिपर ला मिळणार आहे.होय, जो कोणी तेथे घरकामदार म्हणून निकष पूर्ण करेल त्याला सुरुवातीच्या पगाराची रक्कम 18.5 लाख रुपये इतकी असेल. रॉयल घराण्यांनी नोकरीची यादी रॉयल हाऊसिंगच्या अधिकृत वेबसाइटवर पोस्ट केली आहे.(Most Body Modifications: 453 पिअर्सिंग आणि शरीरभर टॅटू असलेल्या Rolf Buchholz ने नाव Guinness World Record मध्ये समाविष्ट, Watch Video)

पोस्टनुसार, ही लेवल 2 अप्रेंटिसशिप नोकरी आहे. निवडलेल्या उमेदवाराची नेमणूक विंडसर कॅसल येथे होईल.जसे की आम्ही आपल्याला सांगितल्याप्रमाणे, ही एक अप्रेंटिसशिप नोकरी असेल निवडलेल्या उमेदवाराला यूकेमधील विंडसर कॅसल येथे राहावे लागेल.त्याला आठवड्यातून पाच दिवस काम करावे लागेल आणि दोन दिवस सुट्टी असेल. नोकरीच्या सुरवातीला पगार सुमारे 18.5 लाख रुपये मिळेल. याशिवाय त्यांचा राहण्याचा आणि जेवणाची व्यवस्थाही पॅलेसद्वारे केली जाईल. एवढेच नव्हे तर या कामामध्ये प्रवासी खर्चही स्वतंत्रपणे देण्यात येईल.निवडलेल्या उमेदवाराची बकिंगहॅम पॅलेससह वर्षभर रॉयलच्या इतर निवासस्थानांमध्ये बदली केली जाईल. नोकरीदरम्यान वर्षात 33 दिवसांची रजा (बँकेच्या सुट्टीसह) देखील समाविष्ट केली जाते. उमेदवाराला इंग्रजी आणि गणितामध्ये पारंगत असणे बंधनकारक आहे.निवडलेल्या उमेदवाराचे मुख्य काम म्हणजे राजवाड्यांचे आतील भाग स्वच्छ ठेवणे. नोकरीच्या आवश्यकतांबद्दल वर्णन करताना त्यांनी लिहिले आहे की,'आपण आमच्या घरकाम करणार्‍या व्यावसायिकांच्या टीममध्ये सामील व्हाल, जेव्हा आपण काम कराल तेव्हा आपण आतील वस्तूंची काळजी घ्याल.'नोकरीचा प्रशिक्षण कालावधी 13 महिन्यांचा आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर उमेदवारास कायम कुटुंबीय म्हणून राजकीय घराण्याकडून नोकरी दिली जाईल.

कसा कराल अर्ज

अधिक जाणून घेण्यासाठी आपल्याला त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जावे लागेल त्यासाठी इथे क्लिक करा.तिथे गेल्यास तुम्हाला एक फॉर्म भरावा लागेल आणि नोकरीसाठी अर्ज करावा लागेल. पण लक्षात ठेवा उमेदवाराने इंग्रजी आणि गणितामध्ये पारंगत असणे आवश्यक आहे.