Most Body Modifications: 453 पिअर्सिंग आणि शरीरभर टॅटू असलेल्या Rolf Buchholz ने नाव Guinness World Record मध्ये समाविष्ट, Watch Video
Rolf Buchholz (संग्रहित संपादित प्रतिमा)

जगातील प्रत्येक माणूस दुसर्‍या माणसापेक्षा वेगळा असतो. काहींना आपल्या आयुष्याशी काहीतरी अद्वितीय करण्याची इच्छा असते, तर काहीजण आपल्या आवडीच्या गोष्टीसाठी कोणत्याही थराला जातात. अशा प्रकारे जगभरात अनेक नानाविध लोक आढळतात. असाच एक अतरंगी माणूस जर्मनीमध्ये राहतो. जगातील सर्वात जास्त वेळा केलेल्या बॉडी मॉडिफिकेशनसाठी (Most Body Modifications) त्याचे नाव गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड (Guinness World Record) मध्ये नोंद झाले आहे. Rolf Buchholz असे या व्यक्तीचे नाव आहे. बॉडी मॉडिफिकेशनमध्ये पिअर्सिंग, गोंदणे किंवा इतर बदल समाविष्ट असतात.

गिनीज वर्ल्ड रेकॉर्डनुसार Rolf Buchholz ने आतापर्यंत आपल्या शरीरात 516 बॉडी मॉडिफिकेशन केले आहेत. ही त्याची आवड असल्याचे तो सांगतो. रॉल्फच्या म्हणण्यानुसार, त्याचे हे काम अद्याप पूर्ण झाले नाही. तो यापुढेही आपल्या शरीरात असे बदल करत राहील. व्यवसायाने तो जर्मन टेलिकॉम कंपनीमध्ये माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करतो. 40 वर्षांचा असताना रॉल्फच्या मनात बॉडी मॉडिफिकेशनची आवड निर्माण झाली. वयाच्या 40 व्या वर्षी त्याने त्याचा पहिला टॅटू आणि पिअर्सिंग केले.

पहा व्हिडिओ -

तो आता 60 वर्षांचा झाला आहे. या 20 वर्षात, त्याने आपल्या शरीरावर अनेक टॅटू बनविले आहेत. तसेच आपल्या शरीराच्या अनेक भागांवर- ओठ, भुवया, हनुवटी, कान अशा अनेक ठिकाणी पिअर्सिंग केले आहे. इतकेच नाही तर त्याने कपाळावर शिंगांच्या प्रमाणे दोन उभारही बसवून घेतले आहेत. रॉल्फ म्हणतो, कदाचित तो बाहेरून बदलला असेल पण आतून अजूनही तसाच आहे. त्याच्या 510 बॉडी मॉडिफिकेशनमध्ये 453 पिअर्सिंग, टॅटू आणि इतर काही बदल समाविष्ट आहेत.

हे सर्व करून तो सामान्य माणसापेक्षा वेगळा दिसू लागला आहे. यामुळे एकदा त्याला दुबईच्या विमानतळावर अडविन्यातही आले होते. त्याचा व्हिडिओ गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने सोशल मीडियावर शेअर केला आहे.