Parle-G ने म्हणून आयकॉनिक गर्ल च्या ऐवजी  Instagram Influencer चा चेहरा लावला पॅकेज वर!
Parle G | Insta

बिस्किट कंपनी Parle ने आज इंटरनेट युजर्सचं एका खास पोस्टने लक्ष वेधलं आहे. त्यांच्या पॅकेट वर असणारी क्यूट बेबी बदलून त्यांनी एका इंफ्लुएन्सरचा चेहरा लावला आहे. हा प्रकार त्यांनी Zervaan J Bunshah च्या वायरल पोस्टला उत्तर देताना केला आहे. या इंफ्लुएन्सरने जर पार्लेचे मालक भेटले तर त्यांना काय संबोधायचे? पार्ले सर, मिस्टर पार्ले की पार्ले जी असं त्याने विचारलं होतं. रिलमध्ये या प्रश्नाच्या वेळी त्याच्या चेहर्‍यावर खूप गोंधळ दिसत होता. सोबतच त्याने बॅकग्राऊंड म्युझिक म्हणून अनिल कपूरच्या राम लखन सिनेमातील 'ए जी ओजी' गाण लावल्याचं पहायला मिळालं आहे.

3-4 दिवसांपूर्वी पोस्ट केलेला हा व्हिडिओ वायरल झाला असून पार्ले जी ने देखील त्याची दखल घेत तितक्याच मजेशीर अंदाजामध्ये उत्तर दिलं आहे. यावेळी त्यांनी ' भूषण जी तुम्ही आम्हांला OG म्हणू शकता' असं म्हटलं आहे. नंतर पार्ले जी ने देखील भूषणचा हसरा फोटो रॅपर वर त्यांच्या आयकॉनिक फोटो ऐवजी पोस्ट केला आहे.' आमच्या बिस्किटांचा आनंद तुमच्या कपभर चहासोबत घ्यायचाही त्यांनी सल्ला दिला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Zervaan J Bunshah (@bunshah)

 

View this post on Instagram

 

A post shared by Parle-G (@officialparleg)

भूषणला देखील हा रिप्लाय अनपेक्षित होता. त्याने लहानपणापासून पार्लेजी आपलं आवडीचं असल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत. दरम्यान नेटकर्‍यांनी या मजेशीर रिल आणि उत्तराचा आनंद घेत इन्फ्लुएन्सरचं कौतुक केले आहे.