Green Chilli Halwa: सोशल मीडियावर व्हायरल झाला मिरचीचा हलवा, तुम्हालाही चाखायला आवडेल का?
हिरव्या मिरचीचा हलवा (Photo Credits: Twitter)

Green Chilli Halwa: सध्या सोशल मीडियावर (Social Media) रोज विचित्र फूड कॉम्बिनेशन (Weird Food Combination) पाहायला मिळत आहे. अनेकदा खाद्यपदार्थांवर प्रयोग करतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. यातील काही प्रयोग पाहून लोकांना आश्चर्य वाटते. तर काही लोकांना यातील अनेक प्रयोग आवडतात. सध्या सोशल मीडियावर हिरवी मिरचीचा हलवा (Green Chilli Halwa) व्हायरल होत आहे. ही नवी रेसिपी व्हायरल झाल्यानंतर हलवाप्रेमी (Halwa Lover) संतप्त झाले आहेत. कदाचित त्यांना हलव्यासोबतचा असा विनोद आवडला नसेल. हिरव्या मिरचीच्या हलव्याचा एक फोटो सध्या सोशल मीडियावर खूपचं चर्चेत आला आहे.

राणा सफवी رعنا राणा या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ट्विटरवर हा फोटो शेअर केला आहे. यासोबत त्यांनी कॅप्शन लिहिलं आहे की. 'हिवाळ्यासाठी हिरव्या मिरचीचा हलवा.' यावर लोकांनी आपापल्या प्रतिक्रियाही नोंदवल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, 'हलवा तोही हिरव्या मिरचीचा, हे काय कॉम्बिनेशन आहे.' दुसर्‍या यूजरने लिहिले आहे, 'तुम्ही आनंदाने खा, मी गाजराचा हलवा खातो.' (वाचा - दिल्लीतील Vegetarian Fish Fry ची सोशल मीडीयात चर्चा; पहा खवय्यांच्या प्रतिक्रिया)

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर अन्नाचे अनेक विचित्र प्रयोग व्हायरल होत आहेत. कोणी मॅगीचे विचित्र प्रयोग करत आहेत, कोणी चहात रुह अफजा मिसळत आहेत. तर कोणी गुलाब जामूनचे पकोडे बनवून चर्चेत आले आहेत. ज्यांना नवनवीन पदार्थ करून पाहण्याची आवड आहे त्यांना कदाचित हा हलवा चाखायला आवडेल. परंतु, बहुतेक लोकांना हा प्रयोग आवडलेला नाही.