Google चा २१ वा वर्धापन दिन: 1998 चा 'Throwback' फोटोच्या माध्यमातून गूगलने साकारले बर्थ डे स्पेशल गूगल डुडल
Google Celebrates Birthday With a Google Doodle (Photo Credits: Google Doodle)

Happy 21st Birthday Google:  गूगल या लोकप्रिय सर्च इंजिनचा आज (27 सप्टेंबर) दिवशी 21 वा वर्धापन दिन (Google’s 21st Birthday) आहे. 1998 साली Larry Pageआणि Sergey Brin दोन पीएचडी विद्यार्थ्यांनी गूगलची (Google) सुरूवात केली. गूगलचे मुख्यालय अमेरिकेमधील कॅलिफोर्निया राज्यात माउंटन व्ह्यू येथे आहे. आज गूगल च्या 21 व्या वर्धापन दिन निमित्त गूगलने डूडलच्या माध्यमातून जुन्या कम्प्युटरचा थ्रो बॅक फोटो शेअर केला आहे. हा तोच संगणक आहे ज्यावर गूगलने प्रोटोटाईप बनवला होता. या स्क्रीनवर गूगल असं लिहलं आहे. तसेच त्यावर टाईमस्टॅम्प आहे ज्यावर 1998 अशी तारीख लिहली आहे. गूगलच्या नावापासून त्याच्या संस्थापकांबाबतच्या काही इंटरेस्टिंग गोष्टी.

गणितातील एका संकल्पनेवरुन गुगल हे नाव ठेवण्यात आले. गुगल म्हणजे एकावर 100 शून्य. याचा अर्थ एक गोष्ट शोधल्यावर 100 गोष्टी सापडतील. मग गुगल हे नाव जगापुढे आले. जगभरात असलेली माहिती योग्य पद्धतीने साठवणे हा कंपनीचा सुरुवातीला मुख्य उद्देश होता. गूगलच्या नावाचं स्पेलिंग मूळ GOOGLE असं होतं. परंतू चूकीने ते GOOGOL असं लिहण्यात आलं.

गूगलच्या बर्थ डेटमध्ये अनेकदा बदल करण्यात आला आहे. 2005 सालपर्यंत 7 सप्टेंबर ही गूगलची बर्थ डेट होती. 2005 साल पर्यंत 8 सप्टेंबर ही तारीख गूगलचा बर्थ डे म्हणून साजरा केला जात होता. त्यानंतर 26 सप्टेंबर आणि आता 27 सप्टेंबर हा दिवस गूगलचा बर्थ डे म्हणून साजारा केला जातो.सध्या भारतीय वंशाचे सुंदर पिचाई गूगलचे सीईओ आहे. जगभरातील 100 विविध भाषांमध्ये गूगलचे सर्च उपलब्ध आहे. आता गूगल कडून सर्च इंजिन सोबतच जीमेल सेवा, युट्युब या सेवा उपलब्ध केल्या आहेत.