2021 हे ग्रेगेरियन कॅलेंडर संपायला आता 23 दिवसांमध्येच संपणार आहे. या वर्षाची सुरूवात कोविड 19 लसीकरणामुळे झाली खरी पण भारताला या वर्षाच्या सुरूवातीला कोविड 19 च्या दुसर्या लाटेने बेजार केले होते. त्यानंतर हळूहळू स्थिती सुधारली पण गूगल वर मात्र चर्चा झाली. आज गूगल या सर्वात मोठ्या सर्च इंजिन कडून यावर्षी गूगल वर नेमकी कशाची चर्चा होती याची यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. गूगल मध्ये यंदाच्या वर्षी सर्वात जास्त चर्चेमध्ये राहिलेल्या विषयांच्या यादी मध्ये इंडियन प्रिमियर लीग (Indian Premier League) हे अव्वल स्थानी आहे. त्यानंतर कोविन अॅप (CoWIN), आयसीसी टी 20 वर्ल्ड कप (ICC T20 World Cup), युरो कप (Euro Cup), टोकियो ऑलिंपिक (Tokyo Olympics) यांची चर्चा राहिली आहे. यंदा कोविड 19 मुळे पहिल्यांदाच आयपीएल चे सत्र दोन भागात पार पडलं होतं. पहिल्यांदाच सत्र अर्ध्यावर थांबवून नंतर दुबई मध्ये खेळवण्यात आले होते. तर कोविन हे अॅप असून ते कोविड 19 लसींच्या नोंदणीकरिता केंद्र सरकारने लॉन्च केले होते.
ऑवरऑल सर्च
;
दरम्यान रेसिपींच्या यादीमध्ये मोदकाचा देखील समावेश आहे. मोदक हा गणपती बाप्पाचा आवडीचा नैवेद्यामधील पदार्थ आहे. महाराष्ट्रात मोदक हे वेगवेगळ्या पद्धतीने बनवले जातात. त्यामध्ये उकडीचे मोदक हे अत्यंत कलाकुसरीचे आणि चवीष्ट असतात. नक्की वाचा: उकडीचे मोदक खाण्याचे आरोग्यदायी फायदे !
How to च्या यादीमध्येही यंदा कोविड 19, कोरोना वायरसचा बोलबाला दिसला आहे. लोकांनी कोविड 19 लस, लसीकरण याबद्दल चर्चा केली आहे. लसीसाठी रजिस्ट्रेशन कसं करायचं ते व्हॅक्सिन सर्टिफिकेट कसं डाऊनलोड करायचं याची चर्चा सर्वाधिक झाली आहे.
हाऊ टू ची यादी
जवळचे कोविड टेस्टिंग सेंटर, जवळचे कोविड व्हॅक्सिन सेंटर याविषयी शोध घेण्यामध्येही यंदा युजर्स व्यस्त होते. ऑक्सिजन कोरोना रूग्णांसाठी जीवनमरणाचा मुद्दा बनला होता त्यामुळे तो जवळ कुठे उपलब्ध होईल याची देखील शोधाशोध करण्यात आली आहे.
नियर मी यादी
पर्सनॅलिटींची यादी
सर्वाधिक चर्चेमध्ये राहिलेल्यांच्या यादीत नीरज चोप्रा हा अव्वल आहे. नीरज ने यंदाच्या ऑलिंपिक मध्ये सुवर्णपदक मिळवत देशाची मान उंचावली आहे. तर त्यापाठोपाठ सध्या ड्र्ग्स केस मध्ये चर्चेत असलेलं नाव आर्यन खान हा दुसर्या क्रमांकावर आहे. आर्यन खान हा बॉलिवूडचा बादशाह शाहरूख खानचा लेक आहे.