Go Air (Photo Credits-Twitter)

गो एअर  (Go Air)विमानात उड्डाणादरम्यान अचानक दोन कबुतर घुसल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. हे प्रकरण शुक्रवाराचे असून विमानात कबुतर आल्याने प्रवासी त्रस्त झाले होते. कबुतरांच्या उडण्यामुळे विमानातील क्रु मेंबर्स आणि प्रवासी या प्रकारामुळे हैराण झाले. प्रवाशांनी या प्रकाराचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करत तो सोशल मीडियात व्हायरल केला आहे. खुप वेळ हा प्रकार सुरु असल्यानंतर ग्राउंड स्टाफच्या मदतीने विमानाचा गेट उघडून कबुतरांना बाहेर हकलवण्यात आले.

विमान संध्याकाळी 6.15 वाजता पोहचणार करणार होते. पण अचानक विमानात कबुतर घुसल्याने ते 6.45 वाजता जयपूर विमानतळावर पोहचले. एका प्रवासाने असे सांगितले की, सर्व प्रवासी विमानात बसले होते. पण जसे विमानाचे दरवाजे बंद झाले तसे एका प्रवाशाने त्याचे सामान ठेवण्यासाठी लगेज शेल्फ उघडले असता त्यामधून कबुतर बाहेर आले.(उंदराच्या पॅडला नाग चिकटला, खोबऱ्याचे तेल वापरून कसा काढला? पाहा व्हिडिओ)

कबुतरांच्या घुसखोरीमुळे क्रु मेंबर्स आणि काही प्रवासी नाराज झाले होते. विमानातील स्टाफे या प्रकरणाची माहिती तातडीने ग्राउंड स्टाफला दिली. त्यानंतर विमानाचे गेट उघडण्यात आल्यानंतर खुप प्रयत्न केल्यानंतर कबुतर विमानाच्या बाहेर गेली.