Girlfriend Wrote Message On 10 Rupee Note: 26 एप्रिलला माझं लग्न आहे, मला पळवून घेऊन जा…;10 रुपयांच्या नोटेवर गर्लफ्रेंडने लिहिला मेसेज, पहा व्हायरल फोटो
Girlfriend Wrote Message On 10 Rupee Note (PC - Twitter)

Girlfriend Wrote Message On 10 Rupee Note: सोशल मीडिया दररोज नव-नवीन पोस्ट व्हायरल होत असतात. या व्हायरल पोस्ट लोकांचे लक्ष वेधून घेतात. यापूर्वी नोटवर लिहिलेले काही मेसेज सोशल मीडियावर चांगलेचं व्हायरल झाले आहेत. काही दिवसांपूर्वी काळापूर्वी सोनम गुप्ता बेवफा असल्याचा मेसेज एका चिठ्ठीवर लिहण्यात आला होता. ही नोट सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला होता. यानंतर लोकांनी खूप मजेदार जोक्स आणि मीम्स देखील शेअर केले होते. आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर एक नोट व्हायरल होत आहे. ज्यावर एका प्रेयसीने तिच्या प्रियकरासाठी एक महत्त्वाचा संदेश लिहिला आहे.

एका प्रेयसीने 10 रुपयांच्या नोटेवर तिच्या प्रियकरासाठी असा संदेश लिहिला, जो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. 10 रुपयांच्या नोटेवर मैत्रिणीने लिहिले की, 'विशाल, माझे लग्न 16 एप्रिलला आहे, मला घेऊन जा. मी तुझ्यावर प्रेम करते. तुझी कुसुम.' आता ही नोट सोशल मीडियावर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे आणि लोक त्यावर आपल्या मजेशीर प्रतिक्रियाही देत ​​आहेत. (हेही वाचा -11 Year Old Boy Hide in Fridge: वादळाचा सामना करण्यासाठी 20 तास फ्रिजमध्ये बसला 11 वर्षाचा मुलगा; पुढे काय घडलं, जाणून घ्या)

त्या चिठ्ठीवर लिहिलेला मेसेज पाहून कुसुम नावाच्या मुलीचे लग्न तिच्या संमतीशिवाय दुसऱ्याशी होत असल्याचे समजते. या कारणास्तव, तरुणीने तिच्या प्रियकराला चिठ्ठीद्वारे संदेश लिहिला आहे की, तिचे 26 एप्रिल रोजी लग्न आहे आणि त्यापूर्वी त्याने तिला घेऊन जावे. आता या नोटेमुळे सोशल मीडियावर घबराट निर्माण झाली आहे.

दरम्यान, लोकांनी ट्विटरवर आशा व्यक्त केली आहे की, 26 एप्रिलपूर्वी कुसुम तिच्या विशालला भेटेल. फोटोसोबतच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे, 'ट्विटर युजर्स तुमची ताकद दाखवा. कुसुमचा हा संदेश 26 एप्रिलपूर्वी विशालपर्यंत पोहोचवा आणि दोन प्रेमींना एकत्र आणा.'