Girl Walking on Building's outer Wall (Photo Credits: Twitter)

काल पासून सोशल मीडियात आणि व्हॉट्सअ‍ॅपवर Hiranandani Estate मध्ये एक मुलगी बिल्डिंगच्या आऊटर वॉलवर चालत असल्याचा एक थरारक व्हिडिओ शेअर होत आहे. दरम्यान हा व्हिडिओ झपाट्याने शेअर होत असल्याने अनेकांनी ठाणे पोलिस, मुंबई पोलिस यांच्यासह ठाण्यातील काही राजकीय मंडळींना टॅग करत हा प्रकार निदर्शनास आणून दिला होता. आता ठाणे पोलिसांनी याची दाखल घेत हा व्हायरल व्हिडिओ महाराष्ट्रातील ठाण्यातील नसून चैन्नईमधील Hiranandani Estate मध्ये घडलेला एक जुना प्रसंग असल्याचं म्हटलं आहे. दरम्यान एका युजरच्या ट्वीटवर प्रतिक्रिया देताना त्यांनी नागरिकांना व्हिडिओची सत्यता तपासल्याशिवाय त्यावर विश्वास ठेवू नका आणि फॉरवर्ड करू नका असे आवाहन केले आहे. Viral Video of Girl Walking On Building Wall: उंच इमारतीच्या वरच्या मजल्याच्या कडेवरुन चालणाऱ्या मुलीचा व्हिडिओ व्हायरल.

दरम्यान आज ditzy_diaz या ट्वीटर अकाऊंटवरून हा व्हायरल व्हिडिओ शेअर करताना मुंबई पोलिसांना टॅग करण्यात आले होते. त्यावेळेस मुंबई पोलिसांनी यामध्ये ठाणे पोलिसांना लक्ष घालण्यास सांगणारे ट्वीट केले होते. त्यावर उत्तर देताना ठाणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्हिडीओ चैन्नई हिरानंदानी इस्टेटमधील जुना व्हिडीओ असून SrPi kasarwadwali पोलिस स्टेशनची त्याची माहिती घेतल्याचं म्हटलं आहे.

ट्वीट

Viral Video: 

दरम्यान ठाणे पोलिसांनी यासोबत पूर्ण माहिती घेतल्याशिवाय माहिती पसरवू नका असं आवाहन देखील केलं आहे.

आजकाल सोशल मीडीयामध्ये अनेक खोटे व्हिडिओ, माहिती, व्हॉट्सअ‍ॅप फॉरवर्ड्स म्हणून पसरवले जातात. दरम्यान यामुळे अनेकदा चूकीच्या माहितीमुळे संभ्रम निर्माण होतो. लॉकडाऊनच्या काळात अशा खोट्या बातम्या, फसवे व्हिडीओ, अपूर्ण माहिती फॉरवर्ड करण्याचे अनेक प्रकार समोर आले आहेत.