Girl Wrapped Snake In Hair: केसात बँडऐवजी जिवंत साप बांधून खरेदीला गेली मुलगी, पाहणाऱ्यांचा उडाला थरकाप! (Watch Video)
मुलीने केसात बँड ऐवजी बांधला साप (Photo Credit: Instagram)

फॅशनच्या नावावर काहीतरी घालणे आणि वापरणे ही काही नवीन गोष्ट नाही. विचित्र दिसणार्‍या लोकांपैकी नुकतीच एक मुलगी देखील काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर चर्चेत आली, जी जेव्हा मॉलमध्ये खरेदीसाठी गेली तेव्हा तिथे उपस्थित लोकांचा थरकापच उडवला. उपस्थतीत लोकांनी जेव्हा तिला बारकाईने पाहिले असता मुलीला पाहून ते हादरले. झाले असे की या मुलीने तिच्या हेअर स्टाइलमध्ये कदाचित कोणीही विचार न करू शकणार असा प्रयोग केला आहे. शॉपिंग करताना तिने केस बांधण्यासाठी कोणतीही हेअरक्लिप किंवा हेअर बँड वापरला नाही. तिनेही केस मोकळे सोडले नाहीत, तर सरळ जिवंत साप बनात गुंडाळून ती खरेदीला दुकानात पोहोचली होती. जो कोणी तिच्याकडे पाहत, तो मुलीच्या फॅशन सेन्सवर थक्क झाला होता. या मुलीच्या धोकादायक हेअर स्टाईलचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल होत आहे.

व्हिडिओमध्ये दिसणार्‍या मुलीने तिच्या केसांसोबत एक अतिशय धोकादायक प्रयोग केला आहे. ती आरामात केसात साप गुंडाळून मोठ्या आत्मविश्वासाने जाताना दिसत आहे. सर्व प्रथम व्हायरल व्हिडिओमध्ये असे दिसून येते की तिने तिच्या केसांमध्ये बनऐवजी काहीतरी विचित्र वस्तू गुंडाळली आहे. कॅमेरा जवळ आल्यावर लक्षात येते की ही विचित्र गोष्ट खरं तर एक धोकादायक साप आहे, जो मुलीने अगदी शांत आणि सहजतेने केसांना बांधून फिरत आहे. याशिवाय उल्लेखनीय बाब म्हणजे जवळपास उपस्थित माणसं जरी तिची ही थरारक हेअर स्टाईल पाहून घाबरत असली तरी ती मुलगी सहज जिवंत साप घालून बाजारात फिरताना दिसली.

तसेच लक्षात घ्यायचे म्हणजे साप देखील बराच स्थिर दिसतो आणि मुलीच्या केसांना गुंडाळलेला बसलेला दिसून येत आहे. हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर snake._.world नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडिओ पाहून लोकांच्या मिश्र प्रतिक्रिया पाहायला मिळत आहेत. सोशल मीडियावर हा व्हिडिओ अनेकांचे लक्ष वेधून देत आहे.