Funny Monkey Viral Video | (Photo Credit: Twitter)

Monkey Viral Video: एक माकड रस्त्यांवरील नागरिकांच्या पिशव्यांची झडती घेतानाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Funny Monkey Viral Video) झाला आहे. एका आयएएस अधिकाऱ्यानेही हा व्हिडिओ आपल्या सोशल मीडिया (Social Media) अकाऊंटवर शेअर केला आहे. हा व्हिडिओ शेअर करताना या अधिकाऱ्याने ही खरी 15 ऑगस्टची तपासणी असे विनोदाने म्हटले आहे. स्वातंत्र्य दिनानिमित्त सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. कोणताही अनुचीत प्रकार टाळण्यासाठी देशभर नाक्यानाक्यांवर तपासणी सुरु आहे. अशात एक माकड (Monkey Video) रस्त्यांवरील येजा करणाऱ्या नागरिकांची तपासणी करत आहे. या व्हिडिओतील माकडाच्या मर्कटलीला पाहून उपस्थितांनाही असून अनावर होते आहे.

रुपिन शर्मा नामक एका आयपीएस अधिकाऱ्याने हा व्हिडिओ सोशल मीडियावर अपलोड केला आहे. व्हिडिओवर स्वातंत्र्य दिनाची तपासणी अशी मजेशीर कमेंटही केली आहे. व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता एक माकड रस्त्यांवरील नागरिकांची कशी तपासणी करत आहे. या माकड एका नागरिकाच्या खिशात हात घालून निरखून पाहताना दिसत आहे. नंतर त्याच्या जवळील बॅगमधील साहित्य बाहेर काढताना पाहायला मिळत आहे. दरम्यान, तिथल्या एका महिलेची पर्स घेऊन त्यातील सामानही ते अत्यंत गंभीरतनेने तपासताना दिसते आहे. जसे की या माकडाला कोणी ड्यूटीवरच तैनात केले आहे.  (दलदलीत अडकलेल्या तरुणाला माकडाने दिला मदतीचा हात; रेस्क्यू ऑपरेशन करतानाचा 'हा' फोटो सोशल मीडियावर होतोय व्हायरल)

ट्विट

सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ अनेकांच्या पसंतीस आला आहे. सोशल मीडियावर हा व्हिडिओ आतापर्यंत शेकडो नागरिकांनी पाहिला आहे. अनेकांनी तर या व्हिडओला मजेशीर प्रतिक्रियाही दिल्या आहेत. काही युजर्ननी म्हटले आहे की हे माकड आपले काम इमानदारीने करत आहे. कोणी म्हटले आहे ही खरी तपासणी.