VIDEO: भंडारा येथे पोलिसांमध्ये फ्री-स्टाईल हाणामारी, एकमेकांना बुटाने चोप; आरोपीला खर्रा देण्यावर वाद
Free-style fight among 4 police person in Bhandara | (Photo Credit: YouTube)

चला रे इथे गर्दी करु नका, तुला पोलिसी खाक्या माहिती नाही काय?, कानून के हाथ लम्बे होते हैं, जगात कोणाच्यापण नादाला लागा खरं पोलिसांच्या नादाला लागू नका, यांसाररखी एक ना अनेक वाक्ये आपण नेहमी ऐकली असतील. या वाक्यांतून पोलिसांबद्दल प्रेम, दरारा आणि भीती अशा बऱ्याच भावना निर्माण होतात. त्यामुळे जनतेचा रक्षक अशी भावना पोलिसांविषयी जनमानसात तयार होते. यासोबत पोलिसांची शिस्त हिदेखील वाखाणन्याजोगीच बाब. पण, या शिस्तीला भंडारा (Bhandara) येथील चार पोलिसांकडून गालबोट लागले आहे. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णू खेडीकर आणि मनोज अंबादे अशी या पोलिसांची नावे आहेत. या पोलिसांमध्ये चक्क तुंबळ हाणामारी झाली. यातील दोन पोलिसांनी तर एकमेकांना बुटाने हाणलं. या फ्री-स्टाईल हाणामारी (Free-style Fight) घडलेल्या घटनेचा व्हिडिओ आता सोशल मीडियातून (Social Media) व्हायरल (Viral Video) झाला आहे.

घटना आहे भंडारा जिल्ह्यातील एका रुग्णालयातील. येथील एका रुग्णालयात आरोपीला वैद्यकीय तपासणीसाठी पोलीस घेऊन आले होते. दरम्यान, या पोलिसांमध्ये आरोपीला खर्रा देण्यारुन वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, हे पोलिस एकमेकांना जोरदार भिडले. पोलिसांमध्ये हाणामारी सुरु झाली. पोलिसांमध्ये होत असलेली हाणामारी पाहून उपस्थित नागरिकही अचंबित झाले. सुरुवातीला हा वाद थोडक्यात थांबेन असे उपस्थित नागरिकांना वाटले. मात्र, हा वाद पुढे वाढतच गेला. त्यामुळे उपस्थित नागरीक मधे पडले आणि त्यांनी पोलिसांना आवर घातली. (हेही वाचा, #Video: Bronx Zoo मध्ये भिंत ओलांडून सिंहा समोर महिलेचा डान्स पोलिसांनी काढले अटक वॉरंट, वाचा सविस्तर)

व्हायरल व्हिडिओ

पोलिसांच्या या कृत्याची जिल्हा पोलीस अधीक्षक अरविंद साळवे यांनी गंभीर दखल घेतली. शिंस्तभंग आणि पोलिसांची प्रतिमा मलिन केल्याचा ठपका ठेवत या पोलिसांनी आता निलंबित करण्यात आले आहे. विकास गायकवाड, निलेश खडसे, विष्णू खेडीकर आणि मनोज अंबादे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलिसांची नावे आहेत. पोलिसांच्या या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियात जोरदार व्हायरल झाला आहे.