#Video: Bronx Zoo मध्ये भिंत ओलांडून सिंहा समोर महिलेचा डान्स पोलिसांनी काढले अटक वॉरंट, वाचा सविस्तर
Women Dances in Front Of Lion (Photo Credits; Instagram)

जंगलाचा राज सिंह कधी कोणाच्या चुकून वाटेत आला तरी भीतीने थरथरायला होते, मात्र अलीकडेच न्यूयॉर्क मधील एका महिलेनं चक्क अभयारण्यातील एका सिंहासमोर जाऊन डान्स करत त्याला चिडवण्याचा प्रताप केला आहे. या प्रसंगाचा एक व्हिडीओ सुद्धा सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा व्हिडीओ ब्रोंक्स झू (Bronx Zoo) मधील असून आता या महिलेला शोधण्यासाठी पोलिस प्रयत्नांत आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार या महिलेचं नाव माया आट्री (Myah Autry) असून काही दिवसांपूर्वी तिने अशाच प्रकारे झू मधील जिराफ क्षेत्रात जाऊन असाच धुमाकूळ घातला होता. जाणीवपूर्वक रित्या वन्यजीवांना त्रास देण्यासाठी या महिलेवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. पोलिसांनी तिच्याविरुद्ध आता अटक वॉरंट काढून महिलेचा शोधण्यासाठी नागरिकांना मदतीचे आवाहन करण्यात आले आहे.

काही दिवसांपूर्वी माया हिने झू च्या भिंतीवरून उडी मारून सिंहाच्या क्षेत्रात प्रवेश केला होता, तिथे सिंहाच्या समोर डान्स करत हाय, बेबी आय लव्ह यु  म्हणत ती त्यांना चिडवू लागली. यावेळी सिंह एक टक होऊन तिच्याकडे पाहत होता. याआधी सुद्धा अशाच प्रकारे तिने अवैध पद्धतीने जिराफांच्या क्षेत्रात उडी घेत असा व्हिडीओ काढला होता. इतकंच नव्हे तर या ठिकाणच्या पोलिसांसोबत एक फोटो काढून तिने आपल्या इंस्टाग्राम वरून शेअर सुद्धा केला होता.

पहा या महिलेचा प्रताप

 

View this post on Instagram

 

Mira el video hasta el final parte 2 📸©️@Realsobrino For license and Usage Contact licensing@viralhog.com . . .

A post shared by Real Sobrino (@realsobrino) on

दरम्यान, या सर्व प्रकारामुळे ब्रॉन्क्स झू मधील व्यवस्थापन वर्गाने नाराजी व्यक्त केली आहे. मुद्दाम स्वतःच्या जीव धोक्यात टाकणे, वन्यजीवांना त्रास देणे, या सर्व गुन्ह्यांसाठी तिला माफ केले जाणार नाही, यासाठी कठोर कारवाई करण्यात येईल असे पोलिसांनी कळवले आहे.